अखेरच्या टप्प्यात चुलत्याने दिलेली साथ समाधान आवताडेंसाठी निर्णायक ठरणार

Samadhan Avtade | BJP | Pandharpur : जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी पुतणे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीवर हात ठेवल्यामुळे आमदार अवताडे गट आणखी मजबूत
Samadhan Avtade | BJP | Pandharpur
Samadhan Avtade | BJP | PandharpurSarkarnama

मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीपासून दुरावलेले नातेसंबंध श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जुळल्याने ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अवताडे गटांना फायदेशीर ठरणार आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप (BJP) आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे उभे ठाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पोट निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले परंतु या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यशस्वी ठरले.

परंतु त्या निवडणुकीच्या निकालानंतर दोघांनी राजकीय बांधणी स्वतंत्रपणे केली त्यामुळे अवताडे कुटुंबीयांशी संलग्न असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची गोची निर्माण झाली होती. अशात गेल्या वर्षभरापासून सिद्धेश्वर अवताडे यांनी देखील विविध सामाजिक उपक्रम राबवत आपले कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी उभी केली. तर दुसऱ्या बाजूला भाजप आमदार समाधान आवताडे यांनी देखील आपला गट स्वतंत्रपणे मजबूत केला.

Samadhan Avtade | BJP | Pandharpur
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? फडणवीसांनी दिली नवी तारीख

पोटनिवडणुकीनंतर समाधान आवताडे यांचा राजकीय वारू वेगाने दौडत असताना तो रोखण्यासाठी समविचारी गटाच्या रूपाने तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले व त्यांच्या विरोधात प्रबळ तगडे आव्हान उभे केले. त्यावेळी समविचारी गटाच्याच बांधणीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या बबनराव आवताडे गटाशी जागा वाटपात योग्य समझोता न झाल्याने ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्याने त्यांनी समविचारी पासून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या काही समर्थकाने स्वतंत्र राहण्यापेक्षा काहीतरी निर्णय भूमिका घेण्यासाठी आग्रह त्यांच्याकडे लावला व प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सगळे अवताडे कुटुंबीय एकाच व्यासपीठावर आल्यामुळे वर्षभर सैरभैर असलेल्या काही कार्यकर्त्यांना समाधान वाटले.

जेष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी पुतणे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठीवर हात ठेवल्यामुळे आमदार अवताडे गट आणखी मजबूत झाला. अशोक केदार यांच्या रूपाने एक जागा बिनविरोध करून घेतली. आता संस्था मतदारसंघाची जागा देखील त्यांच्या गटाकडे जवळपास आल्यासारखे आहे, आतापर्यंतच्या निवडणुकीची आकडेवारी पाहता मंगळवेढा शहरांमध्ये अवताडे गटाचे प्राबल्य मोठे आहे. त्याची परिणीती आतापर्यंतच्या निवडणुकात दिसून आली आहे.

Samadhan Avtade | BJP | Pandharpur
निवडणूक शपथपत्रातील तफावत मुख्यमंत्री शिंदे यांना भोवणार? न्यायालयाचे चौकशीचे आदेश

आता आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे गटाची बांधणी आणखीन मजबूत होणार आहे. कारखान्याच्या रणधुमाळीत प्रसार माध्यमांशी बोलताना खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे म्हणाले होते की, समविचारी आघाडी अविचारीकडे गेल्यामुळे आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली. परंतु आमचे घरगुती विषय बाजूला ठेवून आम्ही एकत्र आलो. त्यामुळे भविष्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका एकत्र लढण्याची संकेत या निमित्ताने मिळू लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com