म्हेत्रेसाहेब, मी हवेत गोळी मारत नाही; कागदावर बोलतो : कल्याणशेट्टींचा हल्लाबोल!

भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर टीका
Sachin Kalyanshetti
Sachin Kalyanshetti Sarkarnama

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट मतदारसंघात मागील अडीच वर्षे विकास कामे करताना कधीच गटातटाचे, पक्षपातीचे राजकारण मी केले नाही आणि भविष्यातही करणार नाही. आजपर्यंत केलेली कामे जनतेसमोर मांडली आहेत. राज्यात सत्ता नाही; असे कारण देत बसलो नाही. मंत्री, प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला. केंद्र सरकारचाही जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddaram Mhetre) मात्र जे काम मंजूरच नाही, त्याबाबत पत्रकार परिषद घेतातच कसे, असा सवाल आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी करत ‘म्हेत्रे यांची राजकारणात टिकून राहण्यासाठी चाललेली ही धडपड आहे,’ अशी टीका केली. (BJP MLA Sachin Kalyanshetti criticizes former minister Siddaram Mhetre)

अक्कलकोट येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी मागील दोन-चार दिवसांपूर्वी नागणसूर येथील कार्यक्रमात बोलताना विकास कामाचा पाठपुरावा आम्ही करतो आणि कुदळ मारण्याचे श्रेय मात्र विरोधक घेतात, अशी अप्रत्यक्ष टीका आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर केली होती. त्याला उत्तर देण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले.

Sachin Kalyanshetti
शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या भावाला खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, दुधनी-सिन्नर ,अक्कलकोट-तोळणूर, कल्लहिप्परगा-नावदगी, हैद्रा-नागणसूर रस्त्याचे भूमिपूजन आपण केले आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना ही राज्यसरकार अंतर्गत येतच नाही, तरी आपण रस्ता मंजूर केल्याचे श्रेय घेत आहे. हा रस्ता मी स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. मी हवेत गोळी मारत नाही. मी कागदावर बोलतो. मी खोटे श्रेय घेण्याचा आयुष्यात कधीही प्रयत्न केलेला नाही. मी पाठपुरावा करून काम मंजूर करूनच कुदळ मारतो. आपण मात्र या रस्त्याचे श्रेय घेत आहात. हा रस्ता मंजूर केलेला एखादा लेखी पुरावा तुमच्याकडे असेल तर दाखवा. मी जाहीरपणे माफी मागेन, असे म्हणत हे सर्व खोटे आहे. म्हेत्रेसाहेब आपण मात्र जनतेला वेड्यात काढण्याचे व फसविण्याचे काम करत आहात. आपण सिनिअर आहात. राज्य मंत्रिपदावर राहिलेला माणूस स्वतःची उंची किती खालीपर्यंत नेणार आहेे, याचा विचार करायला पाहिजे. ज्या कामाचा आपला संबंधच येत नाही, त्या कामाचे आपण श्रेय घेण्याची धडपड कशाला करता? जनतेला काही कळत नाही असे समजू नका. खोटारडेपणाचा कळस गाठू नका, असा सल्लाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माजी मंत्री म्हेत्रे यांना दिला.

Sachin Kalyanshetti
देवेंद्र फडणवीसांना आलेल्या नोटिशीबाबत जयंत पाटील म्हणाले...

दूध संघाच्या मतदारयादीत नावे घुसडली

परवा झालेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्वतःचे आणि मुलाचे नाव सांगवी आणि वरळेगाव येथील मतदारयादीत काहीही संबंध नसताना नोंदविल्याचा आरोप कल्याणशेट्टी यांनी केला. अक्कलकोट बस स्टॅंडसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मी स्वत: वारंवार पाठपुरावा करुन मान्यता मिळवली. पण त्याचेही श्रेय आपण घेत आहात. आजपर्यंत मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेतले नाही. अशा या वृत्तीमुळे खोटारडेपणामुळेच अक्कलकोट तालुक्यातील जनतेने म्हेत्रे यांचा एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. राजकारणात टिकून राहण्यासाठी म्हेत्रे यांची ही चाललेला खटाटोप आहे, असेही कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

Sachin Kalyanshetti
फडणवीसांना त्रास द्याल; तर धडा शिकवला जाईल : भाजप आक्रमक

या वेळी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश हिंडोळे, पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा पोमाजी, आप्पासाहेब बिराजदार, ऋषिकेश लोणारी, श्रीशैल ठोंबरे, दयानंद बिडवे, रमेश क्षीरसागर, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाढवे, प्रकाश पाटील, शिवशंकर स्वामी, कांतू धनशेट्टी, नितीन मोरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com