Maharashtra Politics : निधी वाटपावरुन भाजप-शिंदे गटात धूसफूस,मंत्री सावंतांविरोधात भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Tanaji Sawant Vs Rana Jagjit singh Patil : पालकमंत्री तानाजी सावंतांनी 100 टक्के निधी स्वतःच्या मतदारसंघात घेतल्याचा आरोप...
Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Devendra Fadnavis | Eknath Shinde|sarkarnama

Osmanabad News : निधी वाटपात शिवसेनेला डावललं जात असून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांना निधीत प्राधान्य दिले जात आहे असा आऱोप करत शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंकडून त्यांच्या आमदारांना पूर्ण ताकद दिली जात असून मतदारसंघातील विकासकामांसाठी भरघोस निधी वाटपही केलं जात आहे. मात्र, आता निधी वाटपावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस समोर आली आहे.

मतदारसंघातील निधी वाटपावरून सत्तेत असलेल्या भाजपा आणि शिवसेना आमदारामध्ये वादाची ठिणगी पडल्याचं समोर आलं आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानसचिवांकडे तक्रार केली आहे. त्यांनी पत्रात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आलेला सर्वाधिक निधी शिंदे गटाचे आमदार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भूम परंडा मतदारसंघात गेला आहे.

तसेच भाजप आमदार आणि इतर मतदारसंघात काहीच निधी मिळाला नाही अशी तक्रार पत्रात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांच्यावर भाजपच्या आमदारांची नाराजी असल्याचं समोर आले आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Nilesh Lankhe : विखे-पाटलांविरोधात नीलेश लंके लोकसभेला शड्डू ठोकणार? म्हणाले, पक्षाने...

राणा जगजितसिंहाची तक्रार काय ?

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात चार पैकी 1 भाजप, 2 बाळासाहेबांची शिवसेना आणि 1 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी आमदारांची संख्या आहे. 2022-2023 सालच्या जिल्हा वार्षिक योजनेचा असणारा संपूर्ण निधी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या भूम-परांडा मतदारसंघासाठी प्रस्तावित करून घेतल्याचं समोर आलं आहे.

त्या तुलनेत उस्मानाबाद, उमरगा आणि तुळजापूर मतदारसंघासाठी निधीचा विचार केला तर तो शून्य आहे. इतर तिन्ही मतदारसंघासाठी निधी न देता संपूर्ण 100 टक्के निधी पालकमंत्री तानाजी सावंतानी स्वतःच्या मतदारसंघात घेतल्याचा आरोप होत आहे. यांच्याबाबतीत निधीमध्ये असमानता आहे अशी तक्रार आमदार राणा पाटील (Rana jagjit singh Patil) यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांना केली होती.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Pune Police : पोलीस चालक भरती कौशल चाचणी ; पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांना..

बहुतांश निधी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघासाठी!

उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एकूण 250 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी बहुतांश निधी तानाजी सावंत यांच्या भूम परांडा मतदार संघासाठी आहे तर इतर मतदारसंघांमध्ये तुटपूंज्या निधीची तरतूद करण्यात आली आहे असा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

यात्रा स्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेचं अनुदान एकूण 9 कोटी 50 लाख असून त्यापैकी भूम परांडा मतदारसंघासाठी 8 कोटी 60 लाख आणि इतर मतदार संघांसाठी फक्त 90 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण जिल्हा रस्ते व विकास कामांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी आहे, तो सगळा निधी तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात वळविण्यात आला आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी चिंचवडकरांना दिलेले आश्वासन आचारसंहिता भंगाच्या कचाट्यात सापडणार?

मंत्री सावंतांचा आमदार राणा जगजितसिंहाना टोला

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना पक्षाचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यात जोरदार मतभेद पाहायला मिळत आहेत. तानाजी सावंतांनी तर थेट नाव न घेता राणा पाटलांवर निशाणा साधला आहे.

कोणाला काय वाटतंय, त्याला मी भीक घालत नाही. मला त्याचं काही देणे घेणे नाही. नुसतं बोलणं वेगळं असतं. गेली 30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला, सत्ता होती ना तुमच्याकडे त्यावेळी काय केले, असा प्रश्न सावंतांनी उपस्थित केला. मोठं व खोटं रेटून बोलायचं, जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही. लोक माझ्या मागे राहतील की नाही? या भीतीमुळे प्रगती व विकास करायचं नाही, असे म्हणत सावंत यांनी टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com