नितेश राणेंना कोल्हापूरला हलवणार; सीपीआर रुग्णालयात कार्यकर्त्यांची धावपळ सुरू

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती बिघडली आहे.
Nitesh Rane News
Nitesh Rane News Sarkarnama

कोल्हापूर : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या छातीत दुखत असून, जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील (Kolhapur) राजर्षी छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालयात हलवण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे राणेंच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. कार्यकर्ते सकाळपासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

नितेश राणेंच्या जामिनावर आज न्यायालयात फैसला होणार आहे. त्यांना जामीन झाल्यास त्यांची ओरोसमधील जिल्हा रुग्णालयात तपासणी होईल. मात्र, जामीन नाकारला गेल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राणेंना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. राणेंसाठी त्यांच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. आज सकाळपासूनच त्यांचे कार्यकर्ते सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करीत आहेत.

Nitesh Rane News
मुलाची प्रकृती बिघडताच नारायणे राणेंची जिल्हा रुग्णालयात धाव; पण भेट होणार का?

नितेश राणे हे न्यायालयीन कोठडीत आहेत. काल (ता.4) रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सावंतवाडी कारागृहात न ठेवता नितेश राणेंना रुग्णालयात ठेवावे, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी कालच केला होता. सावंतवाडी कारागृह अधीक्षकांकडे हा अर्ज करण्यात आला होता. राणे यांची प्रकृती बरी नसल्याचे वकिलांनी आधीच न्यायालयाला कळवले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. दरम्यान, राणेंच्या जामिनावर सत्र न्यायालयात आता सुनावणी सुरू आहे.

Nitesh Rane News
आम्ही एका गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला निवडून दिलं! कणकवलीत आत्मक्लेश आंदोलन

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. राणेंच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर न्यायालय आज निर्णय देणार आहे. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नंतर प्रकटले होते आणि काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. नंतक सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते. (Nitesh Rane News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com