
-सुर्यकांत पवार
Jawali-Mahabaleshwar APMC News : सातत्याने तेच तेच चेहरे संस्थेत दिसत असून, अशा भ्रष्टाचारी कंपूना बाहेर काढून संस्था वाचविण्यासाठी जावळी बाजार समितीच्या रिंगणात उतरलो आहे. आमदार मकरंद पाटील Makrand Patil व शशिकांत शिंदे shashikant Shinde यांनी भाजप आमदारांसोबत जाऊन चूक केली आहे. भाजपचा आमदार म्हणजे पोकळ हवा भरलेला फुगा आहे. त्यांच्या विरोधात ताकदीने लढल्यास हा फुगा फुटणार आहे, अशी टीका माजी आमदार सदाशिव सपकाळ Sadashiv Sapkal व राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार Deepak Pawar यांनी केली.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले, ‘‘आमदार मकरंद पाटील व शशिकांत शिंदे यांनी भाजप आमदारांसोबत जाऊन चूक केली असून, हे आमदार म्हणजे पोकळ हवा भरलेला फुगा आहे. त्यांच्या विरोधात ताकदीने लढल्यास हा फुगा फुटणार आहे.’’
दीपक पवार म्हणाले, ‘‘चांगल्या संस्थेत आम्ही राजकारण आणले नाही. जावली बॅंक व्यवस्थित सुरू आहे तिथे निवडणूक का लावली? जावळी दूध संघाचा लिलाव झाला. खरेदी- विक्री संघ बंद पडला. संस्था बाद तुम्ही करताय आणि खापर आमच्यावर का फोडताय. बाजार समितीच्या कारभाराचा पाच वर्षांचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडा. गाळे कोणाला दिले. पोटभाडेकरू कोणी ठेवले हे सर्व जाहीर करावे.’’
प्रतापगड कारखान्याची निवडणूक लावून २० लाखांचा खर्च संस्थेवर टाकला, या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आरोपावर उत्तर देताना दीपक पवार म्हणाले, कारखान्याचे लाखो रुपयांचे भंगार कोणी विकून खाल्ले याचे उत्तर आधी द्यावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात समितीची सत्ता असताना आमदार मकरंद पाटील व शशिकांत शिंदे हे भाजप आमदारांच्या दारात जाऊन आम्ही पाच- पाच घेतो. तुम्ही आठ जागा घ्या, अशा तडजोडी करता ही लज्जास्पद गोष्ट आहे.
श्री. सपकाळ म्हणाले, सातारा- जावळीची एकत्र असणारी बाजार समिती मी आमदार असताना जावळी महाबळेश्वर अशी करून घेतली. त्या वेळी आताच्या आमदारांच्या वडिलांनी या गोष्टीला विरोध केला. त्यानंतर सातत्याने २० वर्ष बाजार समिती एक विचाराने चालली होती. संस्था मोठी व्हावी, शेतकऱ्यांना फायदा व्हावा, म्हणून आजपर्यंत यात आम्ही कधीही राजकारण आणले नाही. चांगली तज्ज्ञ लोक संस्थेवर जाऊन संस्था ऊर्जितावस्थेत जावी हाच प्रयत्न होता. यासाठी गेली तीन महिने प्रयत्न करत होतो.
यासाठी आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये कोणी किती जागा घ्यायच्या याचे नियोजन ठरले होते; पण अंतिम टप्प्यात याबाबत आम्हाला अंधारात ठेऊन तडजोडी झाल्या. संस्था अडचणीत आहे म्हणून निवडणूक नको, असे म्हणायचे मग तुमचीच माणसे तिथे असताना संस्था अडचणीत कशी हे न पटल्याने आम्ही दीपक पवार यांच्यासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. संस्था का व कोणामुळे अडचणीत आहे हे लोकांना कळण्यासाठीच ही निवडणूक लागली आहे.’’
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.