जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली आहे ; पडळकर कडाडले

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे.

जयंत पाटलांना सत्तेचा माज अन्  मस्ती आली आहे ; पडळकर  कडाडले
Gopichand Padalkarsarkarnama

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पडळकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पडळकर म्हणाले, ''जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्यापही माहिती दिली गेली नाही. एका आमदाराला एक अन् दुसऱ्या आमदाराला एक न्याय का असे विचारले असता तर 'आम्ही बघतो पाहतो,'' असे उत्तर पालकमंत्री देतात. खरं तर पालकमंत्री यांना सत्तेचा माज आणि मस्ती असल्याने ते नीट उत्तर देत नाहीत.'' सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते. 

Gopichand Padalkar
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा

सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्हा नियोजन बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार, आमदार शासकीय अधिकारी उपस्थित होते. ''महाआघाडीच्या नेत्यांना विकास कामांसाठी आमदारना जास्त पैसे दिले जात आहेत. मात्र, आम्हाला कमी दिले जातात,'' यावर गोपीचंद पडळकर हे कडाडले. बैठकीतून बाहेर निघून आले. पालकमंत्री आणि या बैठकीचा निषेध केला आहे. ''जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सर्वाना समान न्याय दयायला हवा होता,'' पडळकर म्हणाले..

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या संबधित कंपन्या, नातेवाईक यांची प्राप्तिकर विभागातर्फे छापेमारी सुरु आहे, याबाबत पडळकर म्हणाले, ''अजित पवार याबाबत काय म्हणतात, याला महत्व नाही, आता आमच्याकडे तपास यंत्रणा का छापा टाकत नाहीत. त्यांच्याकडे काही कागदपत्रे असतील, त्यामुळे छापा टाकला असेल,'' असा टोला पवार यांना पडळकर यांनी लगावला..

''महापुरामुळे झालेले नुकसानीची मदत अद्याप काही ठिकाणी मिळाली नाही. माझ्या आटपाडी तालुक्यातील सात गावांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यांना शेतकरी आणि पूरग्रस्तांचे पैसे खायचे आहे,'' असा आरोप पडळकर यांनी यावेळी केला.  

''एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा, तोंडावर आलेल्या दसरा, दिवाळी मध्येच एस टी कर्मचारी आंदोलन करतील. जनतेचे जे हाल होतील त्याला  राज्य सरकार जबाबदार राहील,'' असा इशारा एसटी महामंडळामधील कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा राज्य सरकारला इशारा दिला आहे..

Related Stories

No stories found.