आधी भाजपचं ठरू द्या; मग आमचा निर्णय जाहीर करू : राष्ट्रवादीचा गर्भित इशारा

सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची भाजपची गुरुवारी बैठक
NCP-BJP
NCP-BJPSarkarnama

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापतींचे राजीनामे आणि पदांसाठी नवीन इच्छुकांच्या नावावर चर्चेसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (ता. १४ आक्टोबर) बैठक बोलावली आहे. ही बैठक आजच (ता. १२) होणार होती. मात्र, खासदार संजय पाटील यांचा ऐनवेळी पक्ष कार्यासाठी दौरा निघाला, त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश पदाधिकारी मकरंद देशपांडे यांनी दिली. (BJP meeting on Thursday to change Sangli Zilla Parishad office bearers)

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या पदधिकारी बदलाच्या धोरणावर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील गटनेते शरद लाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आधी भाजपने राजीनामे घेऊ द्या, त्यानंतर काय करायचे, ते आम्ही ठरवू, असा गर्भित इशारा दिला आहे, त्यामुळे सांगली महापालिकेत झालेल्या करेक्ट कार्यक्रमानंतर या प्रतिक्रियेमुळे भाजप सावध पावले टाकण्याची शक्यता आहे.

NCP-BJP
राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापतींचे राजीनामे घ्या आणि नव्यांना संधी द्या, असे आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीला चार महिने बाकी असताना जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाची प्रक्रिया पार पडणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासाठी जिल्हा कोअर कमिटीची महत्वाची बैठक गुरुवारी होणार आहे. त्यात सभापतींचे राजीनामे कधी घ्यायचे, ते घेतल्यानंतर अध्यक्षांनी कधी राजीनामा द्यायचा आणि त्यानंतर नव्या पदाधिकारी निवडीत पक्षाची व्यूहरचना कशी असेल, यावर चर्चा केली जाणार आहे, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

NCP-BJP
चिठ्ठीने भाजपला तारले; महापौर, उपमहापौरपद गमावल्यानंतर सभापतिपदे राखली

दरम्यान, नवीन अध्यक्ष व सभापतिपदासाठी फिल्डिंग लावायला इच्छुकांनी सुरुवात केली आहे. अध्यक्षपद मिरजेलाच निश्‍चित असल्याने सरिता कोरबू यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. उपाध्यक्षपद आणि सभापतिपद अशा पाच पदांसाठी भाजपची कसरत अटळ असणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत संधी मिळालेले वगळता इतर सगळेच इच्छूक असणार आहेत. त्यात नितीन नवले आणि सरदार पाटील यांनी भाजपला रामराम केला असल्याने स्पर्धेतील दोन मोठी नावे आधीच वजा झाली आहेत.

राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड म्हणाले, ‘‘भाजपने बदल करायचे ठरवले आहे, असे समजते. आधी त्यांचे निश्‍चित होऊ द्या, राजीनामा घेतले जाऊ द्यात, त्यानंतर राष्ट्रवादी सदस्यांची बैठक होईल. वरिष्ठ नेत्यांच्या कानावर परिस्थिती घालू आणि मग निर्णय घेऊ.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com