BJP : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची मोर्चे बांधणी; केंद्रीय मंत्री तीन दिवस सातारा दौऱ्यावर

सातारा जिल्ह्याची Satara District जबाबदारी केंद्रीय वाणिज्य मंत्री Commerce Minister सोमप्रकाश Somprakash यांच्यावर देण्यात आली आहे.
Jaykumar Gore, Somprakash
Jaykumar Gore, Somprakashsarkarnama

सातारा : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच संघटनात्मक बांधणी सुरू केली असून १४४ लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश येत्या रविवार (ता. 28) ते 30 जून असे तीन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते केंद्राच्या योजनांचा प्रसार प्रचाराबाबत संघटनात्मक पातळीवर चर्चा करणार आहेत. तसेच जाहीर मेळावे आणि रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपची ताकद दाखवणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

आमदार गोरेंनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मदन भोसले, अतुल भोसले, प्रदेश कार्यकारिणीचे विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम, महिला आघाडीच्या सुरभी भोसले उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, देशातील १४४ लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार निवडून आणण्यासासाठी भाजपच्या केंद्रीय समितीने कालबद्ध कार्यक्रम आखला आहे.

Jaykumar Gore, Somprakash
Dhule News: धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,अमरिशभाई पटेल यांची संधी हुकली!

या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या निमित्ताने प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या वर्षातून चारवेळा त्यांनी मतदारसंघात तीन दिवसांच्या मुक्कामासाठी जाऊन एकूण तयारीचा आढावा घ्यावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय वाणिज्य मंत्री सोमप्रकाश यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांचे आगमन 29 ऑगस्टला सकाळी दहा वाजता शिरवळ येथे होईल.

Jaykumar Gore, Somprakash
Maan : एमआयडीसीच काय, साधे कसपाटही माणच्या बाहेर जाऊ देणार नाही... जयकुमार गोरे

यावेळी जिल्हा भाजपच्यावतीने जिल्ह्याच्या हद्दीवर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर वाई येथे महागणपती मंदिरात आरती तसेच पाचवड येथे नितीन विसापुरे सरपंच यांच्या घरी भेट, लिंब येथे कार्यकर्त्यांशी चर्चा आणि फर्न हॉटेलवर येथे कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा असा कार्यक्रम राहिल.

Jaykumar Gore, Somprakash
भाजप तुमचा अपमान करतयं... आमच्याकडे या मुख्यमंत्री करू : जयंत पाटलांची खुली ऑफर

जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी साडे तीन वाजता केंद्र शासनाच्या योजनेचे लाभार्थ्यांशी ते संवाद साधतील. तसेच दैवज्ञ मंगल कार्यालयात सायंकाळी सात ते आठ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर शासकिय विश्रामगृहात ते पत्रकार व जिल्हा कार्यकारणीच्या सदस्यांशी संवाद साधतील.

Jaykumar Gore, Somprakash
Dr. Bharti Pawar: केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांचा सवाल!

त्यानंतर कोरेगाव, रहिमतपूर या भागांचा दौरा तसेच उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट येथील युवा कार्यकर्त्यांना सोमप्रकाश संबोधित करणार आहेत. 30 ऑगस्टला हुतात्मा स्मारक मलकापूर ते यशवंतराव चव्हाण निवासस्थान कराड अशी भाजप कार्यकर्त्यांची दुचाकी रॅली निघणार आहे. तेथून वेणूताई चव्हाण हॉल येथे कराड तालुक्यातील उद्योगपती, व्यापारी तसेच इतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सोमप्रकाश घेतील.

Jaykumar Gore, Somprakash
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांना भावनिक साद...

केंद्र शासनाच्या लागू केलेल्या योजनांचा आढावा सुद्धा या तिसऱ्या दिवसाच्या दौऱ्यात होणार आहेत. महिला मोर्चा आघाडीच्या प्रतिनिधींची बैठक दुपारी 12 ते 12:45 यादरम्यान विश्वनाथ मल्टीपर्पज हॉल वाठार येथे होईल. हा कार्यक्रम सुरभी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला आहे. दुपारी दोन ते तीन कोयना वसाहत कराड येथे तसेच मलकापूर येथील गेस्ट हाऊसवर सोमनाथ कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.

Jaykumar Gore, Somprakash
Maan : माण, खटाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझं मंत्रिपद...

सातारा लोकसभा मतदारसंघात राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन संघटनात्मक बांधणीची रणनिती आणि पुढील दिशा ठरवली जाणार आहे. बूथ रचना, मंडल प्रमुख यांच्याकडून अहवाल घेणे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणे, आदी कामांच्या जबाबदाऱ्यांचा आढावा या सर्व जबाबदाऱ्यांची माहिती घेऊन त्याचा सविस्तर अहवाल केंद्रीय कार्यकारणी समितीला सादर केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com