इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते लपून बसले

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी इंधन दरवाढीवरून भाजप नेत्यांवर टीका केली.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama

मुंबई - देशातील इंधन दरवाढीवरून भाजप व महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले असताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी इंधन दरवाढीवरून भाजप नेत्यांवर टीका केली. 2014पूर्वी इंधन दरवाढीवरून आंदोलन करणारे भाजप नेते, कार्यकर्ते लपून बसले आहेत का?, असा टोलाही त्यांनी लगावला. ( BJP leaders and activists protesting against fuel price hike went into hiding )

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम जीवनावश्य गोष्टींची दरवाढ होत आहे. यावर केंद्र सरकारचे काही नियंत्रण नाही काय? असा प्रश्न पडत आहे. यावर कोणी बोलताना दिसत नाही. जे कायम बोलतात अच्छे दिन आणू ते हेच अच्छे दिन आहेत का? हे विचारण्याची वेळ जनतेवर आली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम कौटुंबिक बजेटवर होत आहे. इंधन दरवाढीवर आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते लपून बसले आहेत का? जनता त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. या कडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी निरनिराळ्या चौकश्या कारवाया सुरू आहेत. मात्र जनता सुज्ञ आहे. त्यांना समजते केंद्र सरकार त्यांच्यावर जो अन्याय करत आहे. त्याला जनता चोख प्रतिउत्तर देईल, असे मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचे मतांत परिवर्तन होणार नाही...

भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेसच्या एका आमदाराच्या मुलाने ओबीसी आरक्षणा विरोधात याचिका दाखल केल्याचा आरोप होत असल्या बाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोण काय कारण शोधते यापेक्षा ओबीसींना न्याय कसा भेटेल यासाठी महाविकास आघाडीने कायम प्रयत्न केला आहे. प्रयत्न करत राहू. न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
बाळासाहेब थोरात म्हणाले, महागाईवरुन लक्ष वळविण्यासाठी हनुमान चालिसाचा वाद

तो राजद्रोहचं

राणा दाम्पत्यावर राजद्रोहाच्या गुन्ह्या बाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विचार मांडले होते. यावर मंत्री थोरात म्हणाले की, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करताना राज्य सरकारचे म्हणणे न्यायालयात योग्य पद्धतीने मांडले जाईल अथवा उच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येऊ शकते. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाणे, तिथे जाऊन हनुमान चालिसा म्हणून एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी प्रकारचा आहे. महाराष्ट्रात अशांतता कशी निर्माण होईल यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. राज्यातील जनतेत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न हा राष्ट्राविरोधातच आहे, असे मत मंत्री थोरात यांनी मांडले.

Balasaheb Thorat
राज यांच्या आधी रोहित पवारांचा दौरा : अयोध्येत जाऊन घेतले रामलल्लाचे दर्शन

माझे वीज बिल थकीत नाही

सर्वांनीच वीज बिल भरले पाहिजे. तरच ही यंत्रणा चालेल. समाजधुरिणांनी आदर्श निर्माण करून वेळेवर वीज बिल भरले पाहिजे. माझ्या अथवा माझ्या कुटुंबियांकडून कोणतेही वीज बिल थकीत नाही. चालू बाकी कदाचित दिसू शकते. वीज बिल थकीत राहू नये याची काळजी आम्ही घेतो. तशी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com