पंकजा मुंडेंनी तुळजा भवानीला लावला कौल : पण इच्छा पूर्ण होणार का...

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी घेतले तुळजा भवानीचे दर्शन
Pankaja Munde
Pankaja Mundesarkarnama

उस्मानाबाद : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजा भवानीकडे (Tulja Bhavani) सर्वचजण आपल्या मनातले मागणे मागतात. त्याला भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) अपवाद ठरल्या नाहीत. पंकजा आज ता. (७ एप्रिल) उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर चिंतामणी दगडावर दोन्ही हात ठेवून त्यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली. आपली इच्छा पूर्ण होणार का याचा कौल घेतला.

मनातील इच्छा बोलून दाखवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याचेही पाहायला मिळाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. मुंडे यांनी चिंतामणी दगडावर हात ठेवल्यानंतर दगड उजव्या बाजूला फिरला. पंकजा यांना होकारार्थी कौल मिळाला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. यावेळी देवीकडे मागणे मागितले असेही त्यांनी सांगितले.

Pankaja Munde
दीपक पांडेंना वेळीच आवरा; अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीत सुनावले...

पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांचे पक्षात खचीकरण केले जात असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी देविकडे काय कौल मागीतला या संदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान, शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाते गेले आहे. याविषयी विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, एक व्यक्ती गेला म्हणून पक्ष संपला असे वाटत नाही. नाईकांविषयी आम्हाला आदरच आहे. व्यक्ती म्हणून त्यांना आमचा विरोध नाही. आमच्यासोबत आले त्यावेळी आम्ही सत्तेत होतो. ते आता सत्तेकडे गेले आहेत.

Pankaja Munde
गटबाजी संपवून लोकांमध्ये जा; अन्यथा पर्याय शोधू : रोहित पवारांचा राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना इशारा

शरद पवार आणि मोदींच्या भेटीकडे आपण कसे पाहता याविषयी त्या म्हणाल्या, या भेटीकडे बातमी म्हणून बघते. भाजपच्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले असतील. कोल्हापूरच्या ज्योतिबाला कोणते साकडे घातले, असे विचारले असता त्या म्हणाल्या, ओबीसी आरक्षण टिकावे, यासाठी मी ज्योतिबाला साकडे घातले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुरोगामी महाराष्ट्रात दागी मंत्री मंडळ महाराष्ट्रात आहे, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com