आघाडी सरकार पडून वर्षभरात फडणवीस मुख्यमंत्री! चंद्रकांतदादांचं मोठं भाकीत

पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी सरकार पडण्याचे वर्तवले भविष्य
Chandrakant Patil and Devendra Fadnavis
Chandrakant Patil and Devendra Fadnavis Sarkarnama

कोल्हापूर : राज्यातील आघाडी सरकार जून महिन्यात राजकीय वादळ येऊन कोसळेल, असे भविष्य केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकतेच वर्तवले होते. आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही सरकार पडण्याचा मुहूर्त जाहीर केला आहे. वर्षभरात पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

याआधीही अनेक वेळा पाटलांनी सरकार पडण्याचे मुहूर्त जाहीर केले होते. परंतु, ते सगळे फोल ठरले होते. पाटील यांच्यासोबत नारायण राणे आणि इतर भाजप नेतेही सातत्याने सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करीत असतात. प्रत्यक्षात मात्र, काहीच घडताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी सरकार पडण्याचे भविष्य वर्तवलं आहे. एवढ्यावरच न थांबता देवेंद्र फडणवीस हे वर्षभरात पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असेही छातीठोकपणे सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी हे भाकीत केलं आहे.

Chandrakant Patil and Devendra Fadnavis
पीएसआय भरती गैरव्यवहारातील भाजप नेत्याच्या घरी गृहमंत्र्यांनी झाडली पायधूळ!

नुकतेच नारायण राणे हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, शिवसेनेला प्रशासन चालवता येत नाही. मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा शिवसेनेचा आवाका नाही. अडीच वर्षांत मुख्यमंत्री फक्त एकदा मंत्रालयात येतात. दोन तासांत फाईल निकाली काढल्याचे सांगतात यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव तोकडा आहे.

Chandrakant Patil and Devendra Fadnavis
पीएसआय भरती गैरव्यवहाराचं पुणे कनेक्शन; भाजपच्या फरार महिला नेत्याला अटक

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत विचारणा केली असता जे भोंगे नियमानुसार नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका राणेंनी मांडली होती. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. राणे यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. राणे यांच्या भाकिताबद्दल विचारले असता अशी अनेक वादळे परतवून लावण्याची आणि नवे वादळ निर्माण करण्याची क्षमता शिवसेनेत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com