Grampanchayat Election : नगर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींत भाजपची सरशी : काँग्रेस, राष्ट्रवादीने राखले किल्ले

अहमदनगर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली.
Local Bodies elections Latest News
Local Bodies elections Latest Newssarkarnama

Grampanchayat Election : अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक पाच ग्रामपंचायतीवर विजय मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाताच भाजपला अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. मात्र त्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज झाली. यात कर्जत तालुक्यातील तीन व नगर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर भाजपला विजय मिळविता आला.

Local Bodies elections Latest News
Ram Shinde Vs Rohit Pawar | रोहित पवारांना धक्का : तीन ग्रामपंचायतींवर राम शिंदेंचे वर्चस्व

कर्जतमध्ये तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. कोरेगाव, बजरंगवाडी व कुळधरण अशा तीनही ग्रामपंचायती आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने जिंकल्या आहेत. तर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने नगर तालुक्यातील भातोडी व पिंपळगाव उज्जैनी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायत मात्र तानाजी परभणे गटाकडे गेली आहे.

Local Bodies elections Latest News
Shiv sena : ‘नवमर्द’ शिंदे गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी ; शिवसेनेचं टीकास्त्र

राहुरी तालुक्यात तीन ग्रामपंचायतींपैकी जानक व वाघाचा आखाडा ग्रामपंचायत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली. मात्र तांदुळवाडीचा निकाल संमिश्र राहिला. शेवगाव तालुक्यातील विजयगावची सत्ता राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.

संगमनेर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीपैकी दरेवाडी व निमज ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने सत्ता राखली. मात्र मांडवे खुर्दमध्ये स्थानिक आघाडीला सत्ता मिळविता आली.

भाजप - 5

राष्ट्रवादी काँग्रेस - 3

काँग्रेस - 2

स्थानिक आघाडी - 3

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in