भाजपला पिंपरीत धक्का : सरचिटणीसाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे सरचिटणीस बाबू नायर यांनी पद आणि पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
भाजपला पिंपरीत धक्का : सरचिटणीसाचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Babu NayarSarkarnama

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे सरचिटणीस आणि दक्षिण भारतीय आघाडीचे शहर प्रभारी, माजी स्वीकृत नगरसेवक बाबू नायर यांनी पद आणि पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. तसेच लगेचच आज ( गुरुवारी ) शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा धक्का बसला आहे. ( BJP hit in Pimpri-Chinchwad: General Secretary joins Congress )

2015 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नायर हे काँग्रेसमधून आले. काँग्रेसमध्ये असताना ते स्वीकृत नगरसेवक होते. भाजपमध्ये येताच त्यांना एकदा नाही, तर दोनदा सरचिटणीस हे मानाचे पद देण्यात आले. तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणूनही संधी देण्यात आली. सरचिटणीस पदावर असतानाच त्यांनी भाजपला रामराम ठोकला. एवढेच नाही, तर लगेचच पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिर्डी येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्पीय शिबिरात गुरुवारी बड्या नेत्यांच्या हजेरीत ते स्वगृही परतले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा फायदा होणार आहे, असे काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी शिर्डी येथून बोलताना सरकारनामाला सांगितले.

Babu Nayar
Video : बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् तोही नांगरासकट : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, नायर यांच्या राजीनाम्यामुळे मूळ भाजपाईमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॉंग्रेसमधून सात वर्षापूर्वी आलेल्या नायर यांना दोनदा सरचिटणीस हे अध्यक्षानंतरचे महत्वाचे पद व स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी लगेच दिली गेली. मात्र, ती देताना पक्षाच्या जुन्या जाणत्या व अनुभवी कार्यकर्त्यांना,मात्र डावलण्यात आले. त्यामुळे नायर यांनी पक्ष सोडून पुन्हा कॉंग्रेस प्रवेश करताच जुन्या कार्यकर्त्यांच्या ओल्ड इज गोल्ड ग्रुपवर संतप्त प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला. त्यातील अनेकांनी फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

Babu Nayar
रोहित पवारांच्या मतदारसंघात बैलगाडे सुसाट : प्राजक्त तनपुरे म्हणाले...

महेश कुलकर्णी या 42 वर्षे पक्षाचे काम केलेल्या ज्येष्ठ जुन्या भाजपाई कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांना आतापर्यंत साधे स्वीकृत नगरसेवक म्हणूनही संधी देण्यात आली नाही.तशीच गत शहरातील अनेक जुन्या मूळ भाजप कार्यकर्त्यांची आहे. कुलकर्णी यांनी, तर फेसबुकवर नायरांचा राजीनामा टाकून त्यावर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, तत्कालीन पालकमंत्री गिरीष बापट, राज्यमंत्री दर्जा असलेले ॲड. सचिन पटवर्धन यांनी आग्रहाने नायर यांना स्वीकृत नगरसेवक व सरचिटणीस पदी बसवले मात्र वर्षानूवर्षे आपला काम करणारा कार्यकर्ता महेश कुलकर्णी चालला नाही. आता बाबू नायर यांचे काम भागले आणि ते चालू लागले. मनापासून धन्यवाद दादा, बापट, पटवर्धन', असे या पोस्टमध्ये म्हणत कुलकर्णी यांनी थेट पक्षश्रेष्ठींवरच टीका करीत आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in