माळशिरसमध्ये मोहिते पाटलांचे वर्चस्व कायम; २६ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुकीतून मोहिते पाटील यांनी बालेकिल्ला अजूनही मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे.
Malshiras Gram Panchayat Result
Malshiras Gram Panchayat Result Sarkarnama

सोलापूर : माळशिरस (Malshiras) तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीत (Election) २६ ठिकाणी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि समर्थक सरपंच विजयी झाले आहेत. तसेच, ग्रामपंचायत सदस्यांमध्येही भाजपने सर्वाधिक २९२ जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतून मोहिते पाटील (Mohite Patil) यांनी बालेकिल्ला अजूनही मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. (BJP dominates 26 Gram Panchayats in Malshiras)

माळशिरस तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. आज त्याचा निकाल जाहीर झाला, त्यात भाजपने बाजी मारली आहे. तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या ३८९ सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक २९२ जागांवर विजय मिळविला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ७६ सदस्य विजयी झाले आहेत. काँग्रेसचे १३, तर इतर ८ सदस्य जिंकले आहेत.

Malshiras Gram Panchayat Result
वेल्ह्यात काँग्रेसची सरशी : तालुकाध्यक्षाच्या गावातच राष्ट्रवादीचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत

दरम्यान, थेट सरपंचपदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षानेच बाजी मारली आहे. भाजपचे २६ सरपंच निवडून आले आहेत, तर सात ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीला यश आले आहे. काँग्रेस विचाराचे सरपंच दोन ठिकाणी निवडून आले आहेत. विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Malshiras Gram Panchayat Result
बारामतीत धक्कादायक निकाल : राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षाचा तरुणाकडून दारुण पराभव

माळशिरस हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. तो आजही तेवढाच मजबूत असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिसून आले आहे, असा दावा मोहिते पाटील गटाकडून करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in