भाजप जिल्हाध्यक्ष म्हणतात, उद्याच्या बंदमध्ये सहभागी न होता महाविकास आघाडीचा निषेध करा

शेतकरी आंदोलन ( Farmers' Movement ) व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi ) यांच्या अटकेचे कारण देत महाराष्ट्रात ( Maharashtra ) महाविकास आघाडीने ( Mahavikas aghadi ) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष म्हणतात, उद्याच्या बंदमध्ये सहभागी न होता महाविकास आघाडीचा निषेध करा
Arun MundeSarkarnama

अहमदनगर : शेतकरी आंदोलन व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेचे कारण देत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार उद्या ( सोमवारी ) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सामान्य जनतेला या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन होत आहे. मात्र अशा वेळेला भाजपकडून या बंदमध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन होत आहे. या संदर्भात भाजपचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. BJP district president says, protest against Mahavikas Aghadi without participating in tomorrow's bandh

अरूण मुंढेंनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याखंड झाले होते तसेच मावळचा गोळीबार हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. शेतकऱ्यांवर सतत अन्याय करणारे हे पक्ष आहेत. सध्या देखील अनेक जिल्ह्यात तसेच पूर परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन देखील या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कवडीचीही मदत दिली नाही.

Arun Munde
नाथाभाऊ, शूटर लावून मला मारून टाका : चंद्रकांत पाटील

ते पुढे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कुठलीच नुकसान भरपाई तर दिलीच नाही, उलट थकीत बिलांच्या पैशासाठी महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाईट कनेक्शन कट करण्याचे काम चालू ठेवले. त्यातून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे. शेतकऱ्यांना वेळेवर जळलेले रोहित्र बदलून मिळत नाहीत.

महाराष्ट्रात रोज बलात्काराची प्रकरणे समोर येत असताना येथील महिला व मुली सुरक्षित नाहीत. तसेच गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आताशी कुठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून तोट्यात गेलेले व्यवसाय या सणासुदीच्या दिवसात मार्गी लागत असल्याचे दिसू लागले आहेत. असे असताना हा बंद व्यापाऱ्यांच्या मुळावर बसणार आहे. त्यांचे व्यवसाय वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून तुम्ही राज्य शासन चालवणारे शासनकर्ते यांनी उत्तर प्रदेशच्या घटनेचा निषेध केला. तेही समजू शकले असते परंतु राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा हा बहुधा पहिलाच कटू प्रसंग असावा.

Arun Munde
उद्याचा महाराष्ट्र बंद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असता तर कौतुक केले असते ; भाजपचा टोला

भाजपतर्फे शेतकरी व व्यापारी यांना आवाहन करण्यात येते की कृपया या बंदमध्ये सामील होऊ नये. रोज या सरकारच्या मंत्र्यांवर होणारे आरोप व भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत असताना यावरील लक्ष हटवण्यासाठी केलेला हा बालिश प्रयत्न आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये सामील न होता महाआघाडी सरकारचा निषेध करावा. प्रशासनाने देखील सक्तीने बंद करणाऱ्या या प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करून होणाऱ्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, असे मुंढे यांनी म्हटले आहे.

Arun Munde
भाजप आधी कोण सोडणार : सुजय विखे की कर्डिले...

महाविकास आघाडीची तयारी

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष उद्या जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने करणार आहेत. अहमदनगर शहरातील माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उद्या सकाळी 11 वाजता आंदोलन होणार आहे.

Related Stories

No stories found.