मी आणि फडणवीस कमळासाठी आग्रही होतो; पण मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला

माळशिरस तालुक्यातील भाजप आणि भाजप पुरस्कृत नगरसेवकांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात सत्कार
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama

नातेपुते (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील ५१ पैकी ३७ भाजप (bjp) पुरस्कृत नगरसेवकांचे सर्व श्रेय जिल्‍हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संघटन चातुर्याला आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोहिते पाटलांचे कौतुक केले. तसेच, मी आणि देवेंद्र फडणवीस सुरुवातीला या नगरपंचायतीच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही होतो. परंतु मोहिते-पाटील यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करून आघाडीस मान्यता दिली. मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (BJP corporator from Malshiras taluka felicitated by Chandrakant Patil)

कोल्हापूर येथील आयोध्या हॉटेलमध्ये माळशिरस तालुक्यातील श्रीपूर-महाळुंग, माळशिरस, नातेपुते या नगरपंचायतमधील भाजप आणि भाजप पुरस्कृत स्थानिक आघाड्यामधील विजयी नगरसेवकांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. या कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सचिव धैर्यशील मोहिते-पाटील, तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, दादासाहेब उराडे, बाळासाहेब सरगर आणि नवनिर्वाचित ३७ नगरसेवक उपस्थित होते.

Chandrakant Patil
अजित पवारांचे धक्कातंत्र : काकडे, जगतापांच्या कार्यकर्त्यांना दिली प्रथम संधी!

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात आपण ४५८ जागी विजय मिळवून प्रथम क्रमांकावर आलेलो आहोत. या यशात माळशिरसचा सिंहाचा वाटा आहे. यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांचे संघटन चातुर्य, धैर्यशील भैया यांचा संयमी आणि शांत स्वभाव संपूर्ण जिल्ह्याचा असणारा अभ्यास महत्वाचा ठरला आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपुर महाळुंग, नातेपुते माळशिरस या तीनही शहरांत भाजप आणि भाजप पुरस्कृत आघाड्यांनी अटीतटीच्या लढतीत खूप चांगले यश मिळवले आहे. याचा मला आणि देवेंद्र फडणवीस यांना अभिमान आहे.

Chandrakant Patil
नाईट कर्फ्यू मागे घेण्याचा निर्णय; हॉटेल, रेस्टॉरंटवरील निर्बंध हटवले!

प्रारंभी मी आणि देवेंद्र फडणवीस भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही होतो. परंतु मोहिते-पाटलांचा निर्णय योग्य ठरला आहे. आम्ही आग्रही का होतो, तर या निमित्ताने पक्षाचे चिन्ह घरोघरी पोचवण्यास मदत होते. मोहिते-पाटील यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करून आघाडीस मान्यता दिली. विकास कामे म्हणजे फक्त रस्ता, गटारी, पुल एवढच नाही तर लोकांशी चांगला संपर्क ठेवता आला पाहिजे. केंद्राच्या योजना जनतेला दिल्या पाहिजेत. आपले जरी राज्य सरकार नसले तरीही आपण राज्यसभेतील खासदारांचा निधीही आणू शकतो. माणसांची मने जिंकणे महत्त्वाचे आहे. या सरकारने हैदोस घातला आहे. बंडातात्या कराडकरांची क्लिप फार मार्मिक आहे, ती सर्वांनी पाहावी आणि ऐकावी. आगामी काळात आपणास खूप झोकून काम करायचे आहे.

Chandrakant Patil
परदेशातील त्या बैठकीचा पर्दाफाश होण्याच्या भीतीने राऊत झिंगाट झालेत : पडळकर

या वेळी माळशिरस नगरपंचायतीचे विजय देशमुख, शोभा धाईजे, आबा धाईजे, आप्पासाहेब देशमुख, कोमल जानकर, राणी शिंदे, अर्चना देशमुख, प्राजक्ता ओव्हाळ, मंगल केमकर, पुष्पावती कोळेकर, तर महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे उज्ज्वला लोखंडे, लक्ष्मी चव्हाण, तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, नानासाहेब मुडफणे, स्वाती लाटे, प्रकाश नवगिरे, भीमराव रेडे पाटील, निनाद पटवर्धन, मोहसीन पठाण आणि नातेपुते नगर पंचायतीचे अतुल पाटील, संगीता काळे, सुरेश सोरटे, भारती पांढरे, मालोजीराजे देशमुख, अण्णा पांढरे, सविता बरडकर, रणजीत पांढरे, दीपक काळे, स्वाती बावकर, ॲड भानुदास राऊत, उत्कर्षाराणी पलंगे, अनिता लांडगे, शर्मिला चांगण, माया उराडे, राजेंद्र उराडे, दीपिका देशमुख असे एकूण ३७ नगरसेवक समारंभास उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com