कवठे महांकाळमधील भाजप नगरसेवकाची आत्महत्या

ऐन उन्हाळ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरमधून कवठे महांकाळ येथील नागरीकांना स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता.
कवठे महांकाळमधील भाजप नगरसेवकाची आत्महत्या
Rustum ShekdeSarkarnama

शिरढोण (जि. सांगली) : कवठे महांकाळ येथील नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक रूस्तूम रमूलाल शेकडे (वय ४४) यांनी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी (ता. १४ ऑक्टोबर) दुपारी चारच्यादरम्यान उघडकीस आली. या आत्महत्येची नोंद कवठे महांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. (BJP corporator commits suicide in Kavathe Mahankal)

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रूस्तूम रमूलाल शेकडे हे कवठे महांकाळ येथील नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आहेत. नगरपंचायतीच्या २०१६ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पाचमधून भारतीय जनता पक्षाचे खासदार संजयकाका पाटील गटातून निवडून आले होते. त्यांचा चिकन सेंटर व हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रभावी अशी विकास कामेही केली आहेत. तसेच, नेहमी ते सामाजिक कार्यात अग्रेसर होते. ऐन उन्हाळ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरमधून कवठे महांकाळ येथील नागरीकांना स्वखर्चाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता, तर त्यांचे घर हे उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ असल्याने कायम माणसांनी भरलेले असायचे.

Rustum Shekde
भाजप बदलणार ZP अध्यक्ष : काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलण्याची या नेत्यांवर जबाबदारी!

दरम्यान त्यांनी राहत्या घरातील खोलीमध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केली, हा प्रकार दुपारी चारच्या दरम्यान उघडकीस आला. शेकडे यांच्या आत्महत्येची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिक व कवठे महांकाळ शहरातील अनेक कार्यकर्ते व नागरिक जमा झाले. विद्यमान नगरसेवकाने आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कवठे महांकाळ पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.