विधान परिषदेला एक पाऊल मागे आलेल्या महाडिकांनी विधानसभेला डाव साधलाच!

महादेवराव महाडिक यांचे भाचे देणार महाविकास आघाडीला आव्हान | Kolhapur | Kolhapur North | Satyajeet Kadam |
Satyajit Kadam - Mahadeorao Mahadik - Amal Mahadik
Satyajit Kadam - Mahadeorao Mahadik - Amal MahadikSarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (bjp) सत्यजित ऊर्फ नाना कदम यांची उमेदवारी आज (१८ मार्च) निश्चित झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दुपारी त्यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. दरम्यान, सत्यजित कदम यांच्याकडून वेगवेगळ्या भागातील नेते-कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेणे सुरू आहे. (BJP confirms Satyajit Kadam's candidature for Kolhapur North by-election)

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास कालपासून (१७ मार्च) सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत २४ मार्च आहे. तर मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात बुधवारी (१६ मार्च) मुंबईत विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. या बैठकीत कदम यांचे नाव अंतिम करण्यात आले.

याशिवाय कदम यांना तिकीट देवून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही एक प्रकारे डाव साधल्याची चर्चा आहे. कारण सत्यजित कदम हे महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. गतवर्षी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत दिल्लीतून धनंजय महाडिक यांना अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर अमल महाडिक यांनी माघार घेतली होती. त्यामुळे आता भाच्याला तिकीट देत महाडिक यांनी मुलाच्या उमेदवारीची कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com