महावितरणच्या वीज बिल वसुली मोहिमेने भाजप झाले आक्रमक

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) शेतकऱ्यांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे.
महावितरणच्या वीज बिल वसुली मोहिमेने भाजप झाले आक्रमक
भाजपचे महावितरण कार्यालयातील आंदोलनसरकारनामा

अहमदनगर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे. महावितरणच्या या मोहिमे विरोधात आज भाजप नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी अहमदनगर येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा नेला. तसेच महावितरण व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. BJP became aggressive with MSEDCL's electricity bill recovery drive

भाजपने केलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले. या प्रसंगी भाजपचे दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, सचिन पोटरे, मनोज कोकाटे, संदीप नागवडे, माणिक खेडकर आदींसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे महावितरण कार्यालयातील आंदोलन
ऊर्जामंत्री तनपुरेंच्या जिल्ह्यात शेतकरी विरुद्ध महावितरण `सामना`

या प्रसंगी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. अरूण मुंडे म्हणाले की, महावितरण म्हणते आम्ही शेतकऱ्यांसाठी योजना आणली आहे. ही योजना शेतकऱ्यांना वीज देण्याची योजना आहे की शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवण्याची आहे. महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोणतीही लोकहिताची योजना अशा पद्धतीने राबविण्यात आलेली नाही. तुमच्या योजना केवळ ठेकेदारांना पोसणाऱ्या आहेत, असा आरोपही मुंडे यांनी केला.

भाजपचे महावितरण कार्यालयातील आंदोलन
'महावितरण' गंभीर आर्थिक संकटात; सद्या 38, 282 कोटी रुपये कर्जाचा बोझा

भाजप कार्यकऱ्यांनी महावितरण कार्यालयात प्रवेश करताच अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या मांडला. तसेच महावितरण व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. या घोषणांमुळे अधीक्षक अभियंता काकडे दालना बाहेर आले. त्यांनी महावितरणाची बाजू मांडली. महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांमुळे आर्थिक अडचणीत आहे. मिळालेल्या वीज बिलाच्या रकमेतील 33 टक्के रक्कम संबंधित गावात खर्च केली जाणार आहे, असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in