मोठी बातमी : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल !

धनंजय मुंडेच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धनंजय मुंडे सातारा येथील सभेत बोलत होते.
मोठी बातमी : पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल !
Dhananjay Mundhesarkarnama

सातारा : राज्यात महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल सुरु असताना पुढच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याआधी 'पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे,' असे विधान केलं होतं त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल," असे विधान केल्यानं पुन्हा एकदा यावर चर्चा सुरु झाली आहे. (dhananjay munde latest news)

धनंजय मुंडेच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धनंजय मुंडे सातारा येथील सभेत बोलत होते.ते साताऱ्यातील डिस्कळ येथे एका सभेत बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात धनंजय मुंडे दौऱ्यावर आहेत.

Dhananjay Mundhe
काँग्रेस, एमआयएम, टीआरएस नेत्यांच्या मुलांवर सामूहिक बलात्काराची तक्रार

"पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच (NCP) असेल," असे विधान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी विधान केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

यावेळी धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टीका केली. यावेळी त्यांनी "पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल," असे मुंडे म्हणाले.

Dhananjay Mundhe
अजितदादांनी अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये ; राज ठाकरेंवरील टीकेला मनसेचे प्रत्युत्तर

धनंजय मुंडे यांच्या या विधानावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, "प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही तिने पक्ष एकत्र असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in