मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंची प्रचार सभा उधळण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी भालके यांनी बोलावलेल्या बैठकीत उसाची बिलाची मागणी केल्याने सभासद शेतकऱ्यास भालके समर्थकांकडून मारहाण करण्यात आली होती.
Bhagirath Bhalke' Rally
Bhagirath Bhalke' RallySarkarnama

पंढरपूर : पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील खेड भाळवणी येथील सभासदांनी आज (ता. २० जून) ऊस बिलाच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) आणि कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांची प्रचारसभा उधळण्याचा प्रयत्न केला. ऊस बिलाच्या मागणीवरून काही शेतकऱ्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे सभेतही काही काळ अडथळा निर्माण झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भालके यांनी बोलावलेल्या बैठकीत उसाची बिलाची मागणी केल्याने सभासद शेतकऱ्यास भालके समर्थकांकडून मारहाण करण्यात आली होती. (Big news : NCP's Bhagirath Bhalke's campaign rally was disrupted)

पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कमालीची चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी विठ्ठल परिवारातून युवराज पाटील यांनी बाहेर पडून स्वतंत्र पॅनेल उभा केला आहे. तसेच, उद्योजक अभिजित पाटील यांनी तर काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी चालवली आहे. तसेच विद्यमान अध्यक्ष भगिरथ भालके आणि कल्याणराव काळे हे दोन्ही गट एकत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणुकीत प्रथमच कमालाची चुरस निर्माण झाली आहे.

Bhagirath Bhalke' Rally
भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अजित पवारांची भेट!

सध्या पंढरपूर तालुक्यातील गावोगावी प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. तीनही पॅनेलकडून सभासदांना भेटणे आणि मोठ्या गावांत सभा घेतल्या जात आहेत. भालके आणि कल्याणराव काळे हे खेड भाळवणी या ठिकाणी प्रचाराला गेले होते, त्यावेळी तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उस बिल देण्याची मागणी केली. याच मुद्यावर सभेत गोंधळ घालत काळे आणि भालके यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र, भगिरथ भालके व इतर नेत्यांनी समजूत काढत सभा पुढे चालू ठेवली. शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर ही सभा सुरळीतपणे पार पडली.

Bhagirath Bhalke' Rally
नाराज दिलीप मोहिते अजितदादांच्या भेटीला; मतदानाबाबत केले सूचक वक्तव्य!

दरम्यान, मागील पंधरा दिवसापूर्वी पंढरपूर येथे भगिरथ भालके यांच्या बैठकीत ऊस बिलावरून गोंधळ उडाला होता. भालके यांच्या समर्थकांनी ऊस बिल मागणाऱ्या सभासद शेतकऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आज खेड भाळवणी येथील सभासदांनी ऊस बिलाची मागणी करत भालके यांची प्रचार सभा उधळण्याचा प्रयत्न झाला आहे. विठ्ठल कारखाना निवडणुकीमुळे पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com