मोठी बातमी : माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा जामीन अर्ज नामंजूर

Crime News : आमदार नीतेश राणे यांनी दौंड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.
Crime News
Crime News Sarkarnama

दौंड : दौंड शहरातील तरूणीचा विनयभंग करून जाब विचारणाऱ्या तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी तथा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

दौंडचे पोलिस उप अधीक्षक तथा तपास अधिकारी राहुल धस यांनी याबाबत माहिती दिली. बारामती येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयात संशयित आरोपी बादशहा आदम शेख याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.सदर प्रकरणात सरकारच्या वतीने अ‍ॅड. प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली. न्यायालयाने सदर अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

Crime News
पिंपरीच्या आयुक्तांची अवैध धंद्याविरोधात मोहिम; चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई

दौंड शहरातील तरूणीचा २० ऑक्टोबर रोजी विनयभंग करून त्या बाबत जाब विचारणाऱ्या तिच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.दौंड पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी केंद्रिय आयोगाकडे धाव घेतल्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.पीडितेच्या फिर्यादीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता व दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्यासह एकूण २० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग, बेकायदा शस्त्र बाळगणे, दंगल करणे,आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
"महाराष्ट्र तुम्हाला सांभाळता आला नाही आणि बिहार दौरा करायला निघाले..''

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास २१ दिवसांचा विलंब केल्यानंतर संशयितांना अटक करण्यासही विलंब केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दौंड पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणात फक्त चार आरोपींना अटक केली असून अन्य फरार आहेत.

बादशहा शेख याने सलग २९ वर्षे नगरसेवक, दौंड नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ५ वर्षे गटनेता, दौंड बाजार समिती स्वीकृत संचालक आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in