महामंडळांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : भागभांडवलात मोठी वाढ
पुणे - राज्यातील सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या चारही महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ( Big decision of state government to improve the condition of corporations: big increase in share capital )
महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा एक हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. तर, दिव्यांग वित्त व विकास महामंडळाला पाचशे कोटींची वाढीव मर्यादा देण्यात आली आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा यापूर्वी पाचशे कोटी होती. ती वाढवून एक हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा तीनशे कोटींवरून एक हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी सुमारे 73 कोटी होती. ती देखील वाढवून एक हजार कोटी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 50 कोटींवरून पाचशे कोटी करण्यात आली आहे.
या चारही महामंडळांचे भागभांडवल वाढविल्यामुळे अनुसूचित जातीतील लाभार्थी घटकांना कर्ज वाटप, रोजगार व स्वयं रोजगारांच्या वाढीव संधी, दीर्घ मुदत कर्ज योजना, कौशल्य विकासाच्या योजना राबवून त्यांचे जीवनमान उंचावण्यात मोठा हातभार लागणार आहे, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.