नेवासेमध्ये शिवसेनेला रोखण्याचे 'भाजप'पुढे मोठे आव्हान..

अहमदनगर जिल्हा परिषदेतील गट तर नेवासे पंचायत समितीची गण रचनेची प्रारूप यादी काल ( गुरुवारी ) प्रसिद्ध झाली.
Shivsena Vs BJP News, Ahmednagar News in Marathi
Shivsena Vs BJP News, Ahmednagar News in Marathisarkarnama

Ahmednagar News in Marathi

सोनई ( जि. अहमदनगर) - अहमदनगर जिल्हा परिषदेतील गट तर नेवासे पंचायत समितीची गण रचनेची प्रारूप यादी काल ( गुरुवारी ) प्रसिद्ध झाली. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. नेवासे तालुक्यात शिवसेना व भाजप यांच्यातच प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. ( Big challenge for 'BJP' to stop Shiv Sena in Newasa ... )

नेवाशातील जिल्हा परिषद गटाची नवीन रचना समोर येताच तालुक्यात राजकीय चर्चेचा फड सुरु झाला आहे. क्रांतिकारी पक्षाकडून आमदार झालेल्या शंकरराव गडाखांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असल्याने तालुक्यातील सद्यस्थिती नुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती करीता 'भाजपा'ला मोठा संघर्ष करावा लागेल असे सध्या तरी चित्र दिसत आहे.

Shivsena Vs BJP News, Ahmednagar News in Marathi
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

मागील निवडणुकीत गडाख गटाचे सात पैकी पाच जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते. एक भाजपचा तर एक सदस्य राष्ट्रवादीचा निवडून आला होता. अलीकडच्या सहा महिन्यात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. याशिवाय गडाख व घुले पाटील यांची जुळलेली सोयरीक बघता आठ गट व सोळा गणासाठी 'भाजपा'ला मोठा संघर्ष करावा लागेल असे दिसते.

Shivsena Vs BJP News, Ahmednagar News in Marathi
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

मागील जिल्हा परिषद भेंडा गटात भाजपाचे दत्तात्रेय काळे, कुकाणेत 'राष्ट्रवादी' च्या डाॅ.तेजश्री लंघे तर भेंडा पंचायत समिती गणात भाजपाचे अजित मुरकुटे व शिरसगाव गणात राष्ट्रवादीच्या सुषमा खरे निवडून आल्या होत्या. अन्य पाच जिल्हा परिषद गट व बारा गणात मंत्री गडाखांनी बाजी मारली होती. शनिशिंगणापूर हा गट नव्याने वाढला असुन जुने खरवंडी व कुकाणे गटाऐवजी सलाबतपुर व पाचेगाव गणाला गटाचा मान मिळाला आहे. मुळाथडीतील अनेक गावे पाचेगाव गटात गेल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

Shivsena Vs BJP News, Ahmednagar News in Marathi
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

जिल्हा परिषदेतील नवीन गट

1 ) बेलपिंपळगाव गटात शिरसगाव, घोगरगाव, प्रवरासंगम सह एकुण 20 गावे आहेत.

2) सलाबतपूर गटात रामडोह, खामगाव, दिघी सह एकुण सोळा गावे आहेत

3) भेंडे गटात कुकाणे, देवगाव, रांजणगाव सह एकुण 13 गावे आहेत.

4) भानसहिवरे गटात सुरेशनगर, गोंडेगाव, कारेगाव सह सोळा गावे आहेत.

5) पाचेगाव गटात नेवासे बुद्रुक, करजगाव, पानेगाव, खेडले सह 17 गावे आहेत.

6) शनिशिंगणापूर गटात वडाळा, खरवंडी, तामसवाडी सह बारा गावे आहेत.

7) सोनई गटात घोडेगाव, लोहगाव, झापवाडी सह आठ गावे आहेत.

8) चांदा गटात माका, देडगाव, तेलकुडगाव सह 13 गावे आहेत.

पंचायत समिती नवीन गण

1) बेलपिंपळगाव

2)प्रवरासंगम

3) खामगाव

4) सलाबतपूर

5) कुकाणे

6) भेंडे

7) मुकिंदपूर

8) भानसहिवरे

9) पाचेगाव

10) करजगाव

11) खरवंडी

12) शिंगणापूर

13) सोनई

14) घोडेगाव

15) चांदा

16) देडगाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com