Bhima Sugar : मोहोळची लिट्‌मस टेस्ट ‘डिस्टिंक्शन’मध्ये जिंकली; आता भीमा पॅटर्न कायम राहणार : उमेश पाटलांची प्रतिक्रिया

मोहोळ तालुक्याची, सोलापूर जिल्ह्याची व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान शरमेने खाली घालवणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या नेतृत्वाला मतदारांनी लोकशाही मार्गाने योग्य जागा दाखवली.
Dhananjay Mahadik-Umesh Patil
Dhananjay Mahadik-Umesh PatilSarkarnama

सोलापूर : भीमा कारखान्याची निवडणूक (Bhima Sugar Factory) म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भावी निवडणुकांची लिट्‌मस टेस्ट होती. या परीक्षेत आम्ही मुन्ना साहेबांच्या (Dhananjay Mahadik) नेतृत्त्वात ‘डिस्टिंक्शन’मध्ये पास झालो आहोत. भविष्यातील सर्व निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना साक्षी ठेऊन हा उत्तुंग विजयाचा ‘भीमा पॅटर्न’ कायम राहील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यातील विजयानंतर दिली. या पॅटर्नच्या माध्यमातून उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. (Bhima pattern will continue in Mohol taluka: Umesh Patil)

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
Bhima Sugar Factory Result : धनंजय महाडिकांची दणदणीत बाजी; विश्वराजही विजयाच्या उंबरठ्यावर!

उमेश पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमच्या आघाडीचा विजय निश्चित होता. हा विजय आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. या विजयाचे श्रेय मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी सभासदांच्या सदसद्विवेकबुद्धीला समर्पित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांनी जुलमी, असंस्कृत, असभ्य, मुजोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेतृत्वाला झुगारून दिले आहे.

मोहोळ तालुक्याची, सोलापूर जिल्ह्याची व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान शरमेने खाली घालवणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या नेतृत्वाला मतदारांनी लोकशाही मार्गाने योग्य जागा दाखवली. भीमाची निवडणूक म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भावी निवडणुकांची लिट्‌मस टेस्ट होती. या परीक्षेत आम्ही मुन्ना साहेबांच्या नेतृत्त्वात ‘डिस्टिंक्शन’मध्ये पास झालो आहोत. भविष्यातील सर्व निवडणुकीत आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना साक्षी ठेऊन हा उत्तुंग विजयाचा ‘भीमा पॅटर्न’ कायम राहील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
Bhima Factory Result : महाडिकांची विजयाच्या हॅट्‌ट्रीकडे वाटचाल; पहिल्या फेरीत पॅनेल सरासरी २२०० मतांनी आघाडीवर

खासदार धनंजय महाडिक यांनी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून त्यांनी ३१ मते घेतली असून त्यांचे विरोधातील उमेदवार राजेंद्र चव्हाण यांना १२ मते मिळाली आहेत. तब्बल १९ मते अधिक घेत खासदार धनंजय महाडिक यांनी संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून विजय मिळविला आहे.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
Bhima Sugar Factory : पहिल्या फेरीअखेर महाडिकांच्या पॅनेलचा डंका!

पहिल्या फेरीत आघाडीवर असलेले धनंजय महाडिक यांच्या भीमा शेतकरी विकास आघाडी पॅनलचे आघाडीवर

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

विश्वराज महाडिक- 5826(महाडिक पॅनल)

देवानंद गुंड - 2177 (राजन पाटील पॅनल)

(आघाडी - 3649)

पुळूज व्यक्ती उत्पादक गट

बिभीषण वाघ- 5621(महाडिक पॅनल)

कल्याणराव पाटील - 2229(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3392)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

संभाजी कोकाटे - 5810(महाडिक पॅनल)

शिवाजी भोसले - 2250(राजन पाटील पॅनल)

(आघाडी -3560)

टाकळी सिकंदर व्यक्ती उत्पादक गट

सुनील चव्हाण - 5822(महाडिक पॅनल)

राजाराम माने - 2153(राजन पाटील पॅनल)

(आघाडी - 3669)

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

तात्यासाहेब नागटिळक - 5795(महाडिक पॅनल)

पंकज नायकुडे - 2199(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3596

सुस्ते व्यक्ती उत्पदक गट

संतोष सावंत - 5537(महाडिक पॅनल)

विठ्ठल रणदिवे - 2133(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3404

अंकोली व्यक्ती उत्पदक गट

सतीश जगताप - 5703(महाडिक पॅनल)

भारत पवार - 2176(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3527

गणपत पूदे - 5557(महाडिक पॅनल)

रघुनाथ सुरवसे - 2052(राजन पाटील पॅनल)

आघाडी,- 3505

कोन्हेरी गट

राजेंद्र टेकळे - 5766(महाडिक पॅनल)

कुमार गोडसे -2416(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3350

अनुसूचित जाती जमाती

बाळासाहेब गवळी - 5775(महाडिक पॅनल)

भारत सुतकर - 2275(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3500

महिला राखीव

सिंधू जाधव - 5861(महाडिक पॅनल)

अर्चना घाडगे -2230(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3631

महिला राखीव

प्रतीक्षा शिंदे - 5709 (महाडिक पॅनल)

सुहासिनी चव्हाण - 2192(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3517

इतर मागास प्रवर्ग

अनिल गवळी -5900 (महाडिक पॅनल)

राजाभाऊ भंडारे - 2231(राजन पाटील पॅनल)

आघाडी : 3669

भटक्या विमुक्त जाती जमाती

सिद्राम मदने - 5842 (महाडिक पॅनल)

राजू गावडे - 2215(राजन पाटील पॅनल)

आघाडी - 3627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com