Bhima Factory Result : महाडिकांची विजयाच्या हॅट्‌ट्रीकडे वाटचाल; पहिल्या फेरीत पॅनेल सरासरी २२०० मतांनी आघाडीवर

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत पंढरपूर तालुक्यातील पुळूज आणि पुळूजवाडी परिसरात महाडिकांना एकतर्फी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
Bhima Sugar Factory Results
Bhima Sugar Factory ResultsSarkarnama

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या (Bhima Sugar Factory) पहिल्या फेरीत सुमारे ७५०० मतांची मोजणी पूर्ण झाले आहे. या पहिल्या फेरीअखेर खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे पॅनेल २२६४ मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे भीमा कारखान्याच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांची विजयाच्या हॅट्‌ट्रीकडे वाटचाल सुरू आहे. भीमा कारखान्याची सत्ता पुन्हा महाडिकांच्या हाती जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. (Bhima Factory Results : Dhananjay Mahadik's panel leads by of 2200 votes in first round)

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दोन फेरीत लागणार आहे. निवडणुकीत एकूण १९ हजार ४३० पैकी १५ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सध्या पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील सुमारे ७५०० मतांची मोजणी झाली असून त्यात महाडिक गटाने विजयाकडे कूच केल्याचे दिसत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत पंढरपूर तालुक्यातील पुळूज आणि पुळूजवाडी परिसरात महाडिकांना एकतर्फी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या भागात महाडिकांच्या गटाला तब्बल १२६० मतांचे अधिक्य मिळाले आहे, त्यामुळे भीमा कारखान्याच्या निवडणुकीत पुळूज परिसरात महाडिकांसाठी निर्णायक ठरला आहे.

Bhima Sugar Factory Results
Bhima Sugar Factory : पहिल्या फेरीअखेर महाडिकांच्या पॅनेलचा डंका!

पहिल्या फेरीत आंबेचिंचोली, पुळूज, पुळूजवाडी, फुलचिंचोली, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी व तारापूर या केंद्रवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या केंद्रावर झालेल्या मतमोजणीत महाडिकांच्या भीमा परिवार पॅनेलला ५८४१ मते मिळाली आहेत, तर विरोधी राजन पाटील-प्रशांत परिचारक यांच्या पॅनेलला ३५७७ च्या आसपास मते मिळाली आहेत. त्यामुळे महाडिकांचा पॅनेल सरासरी २२०० मतांनी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) जोरात चालल्याचे दिसून येत आहे.

Bhima Sugar Factory Results
Bhima Sugar Factory Result : धनंजय महाडिक गटाचे उमेदवार पहिल्या टप्प्यात आघाडीवर

दुसऱ्या फेरीत तुंंगत, सुस्ते, अंकोली, अर्धनारी, इंचगाव, वडदेगाव, बेगमपूर, वाघोली, शेजबाभूळगाव, येणकी, विरवडे बुद्रूक, कोथाळे, काटेवाडी, कुरुल, सोहाळे, वडवळ, ढोकबाभूळगाव, पोखरापूर, गोटेवाडी, नजिक-पिंपरी, पापरी, येवती, कोन्हेरी, खंडाळी आणि भीमा कारखाना कॉलनी या केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com