Bhima Sugar Factory Result : धनंजय महाडिक गटाचे उमेदवार पहिल्या टप्प्यात आघाडीवर

भीमा कारखान्यासाठी ५६ मतदान केंद्रावर रविवारी मतदान झाले होते. त्यातील २८ केंद्रावरील मतमोजणी सध्या सुरू आहे.
Bhima Sugar Factory Result
Bhima Sugar Factory ResultSarkarnama

सोलापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना (Bhima Sugar Factory) निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या भीमा परिवार पॅनेलने आघाडी घेतली आहे. सध्या २८ मतदान केंद्रावरील मतमोजणी सुरू आहे. ही मतमोजणी कारखाना परिसरातील म्हणजे महाडिक यांच्या भागातील आहे. (Bhima Factory Result : Candidate of Dhananjay Mahadik group leads in first phase)

दरम्यान, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष धनंजय महाडिक निवडणूक लढवत असलेल्या संस्था प्रतिनिधी मतदारसंघाची मतमोजणी शेवटी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Bhima Sugar Factory Result
मोठी बातमी : Jitendra Awhad राजीनामा देणार ; टि्वटमुळे खळबळ

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिंकदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी चुरशीने ७९ टक्के मतदान झाले होते. आज सोलापुरात कारखान्याची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात महाडिक यांच्या पॅनेलने आघाडी घेतली आहे.

Bhima Sugar Factory Result
Jitendra Awhad resign : आव्हाडांवर विनयभंगाच्या गुन्हा दाखल ; राष्ट्रवादीकडून जाळपोळ

भीमा कारखान्यासाठी ५६ मतदान केंद्रावर रविवारी मतदान झाले होते. त्यातील २८ केंद्रावरील मतमोजणी सध्या सुरू आहे. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील २६, तर मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी परिसरातील दोन केंद्रांचा समावेश आहे. हा भाग महाडिक यांचे वर्चस्व असलेला आहे. त्यामुळे या गटात महाडिक गटाच्या उमेदवारांना पहिल्या टप्प्यात आघाडी मिळाली आहे.

Bhima Sugar Factory Result
Ashish Shelar : आव्हाड, 'राजीनामा द्या, ती जागाही आम्ही जिंकू ' ; शेलाराचं खुलं आव्हान

भीमा कारखान्यासाठी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार पॅनेलने निवडणूक लढवली होती. तर विरोधात माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. विशेषतः राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील कलगीतुरा राज्यभर गाजला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in