Bhima Sugar Factory : महाडिकांना साथ देण्यासाठी उमेश पाटील राष्ट्रवादीचे शिबिर अधर्वट सोडून आले...

भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.
Dhananjay Mahadik-Umesh Patil
Dhananjay Mahadik-Umesh PatilSarkarnama

सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून मोहोळचे (जि. सोलापूर) राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. त्यातच भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या ताब्यात असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याची (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत भाजप (BJP) खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराला राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांची खंबीर साथ मिळाली आहे. (Bhima Factory Electionv : BJP MP Dhananjay Mahadik support By NCP's Umesh Patil)

गेल्या काही दिवसांपासून जनता दरबाराच्या माध्यमातून प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर आरोपाच्या अनेक फैरी झाडल्या आहेत. उमेश पाटील यांच्या तुफान वकृत्व शैलीचा व मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील यांचा कट्टर विरोधक म्हणून तयार झालेल्या प्रतिमेचा लाभ खासदार धनंजय महाडिक यांना भीमा साखर कारखान्याचे निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. खासदार महाडिक यांच्या भीमा परिवाराच्या प्रचाराचा शुभारंभ वडवळ (ता. मोहोळ) येथून झाला.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
वळसे पाटील अन्‌ माझे वय झाले, याचा अर्थ आम्ही रिटायर्ड होणार असे नाही : आढळरावांची तुफान बॅटिंग

राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिर्डी येथील पक्षाचे शिबिर अर्धवट सोडून खासदार महाडिक यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला हजेरी लावली. सध्या निवडणूक जरी भीमा सहकारी साखर कारखान्याचे असली तरीही मोहोळ तालुक्याच्या आगामी निवडणुकांमध्ये खासदार महाडिक व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची समविचारी युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
अजितदादांना मुख्यमंत्रिपदाचा मार्ग सापडलाय : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. यापूर्वी झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या दोन निवडणुकीत भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलचे फायर ब्रँड व आक्रमक नेते म्हणून आमदार (कै.) भारत भालके यांनी प्रमुख जबाबदारी पारार पाडली होती. काही भालके यांच्या अस्सल ठसकेबाज भाषणामुळे भीमा कारखान्याच्या दोन्ही निवडणुकीत खासदार महाडिक यांचे पारडे जड झाले होते. भारत भालके यांची पोकळी भरुन काढून अस्सल ग्रामीण भाषेत विरोधकांचा खरपूस समाचार घेण्याची संधी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यापुढे आहे.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
सहकार क्षेत्रात आपण कायम सिद्रामप्पा पाटलांबरोबर राहणार : सचिन कल्याणशेट्टींची भूमिका

खासदार महाडिक यांच्या भीमा परिवाराच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, भाजप नेते संतोष पाटील यांच्यासह मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील विरोधक व पंढरपूर तालुक्यातील माजी आमदार प्रशांत परिचारक विरोधक एकवटले आहेत. भीमा साखर कारखान्यासाठी १३ नोव्हेंबरला मतदान होत आहे. तोपर्यंत भीमापट्टा आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने धुमसत राहणार हे निश्चित.

Dhananjay Mahadik-Umesh Patil
‘अंधेरीतील विजय शिंदे गट-भाजपला चपराक; त्यांची कटकारस्थाने जनतेला आवडली नाहीत’

....म्हणून मी धनंजय महाडिकांसोबत : उमेश पाटील

सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/यामध्ये निवडणुका लढताना व काम करताना पक्षाचे जोडे बाजूला ठेवले जात असल्याचे जिल्ह्याचे सहकारातील दिग्गज नेते सांगतात. त्यांच्या या सांगण्याचा संदर्भ राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी देत आपण भीमा कारखान्याच्या निवडणुकीत भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले. भीमा सहकारी साखर कारखाना हा मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. सहकारी साखर कारखाना म्हणजे सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा कारखाना असतो. सभासदांच्या मालकीचा कारखाना हा सभासदांच्याच मालकीचा राहावा, यासाठी आपण भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्यासोबत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com