Satara News: गद्दारांना धडा शिकविण्यासाठी लढा उभारावा लागेल... भास्कर जाधव

Bhaskar Jadhav भास्कर जाधव म्हणाले, ठाकरे सरकारने मंजुरी दिलेल्या कामांची ही गद्दार मंडळी भूमिपूजन व उद्‍घाटन करत आहेत.
Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Bhaskar Jadhav, Shambhuraj Desaisarkarnama

Patan News : १९९७ ला स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी व २०१९ ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांनी देसाई घराण्याला मंत्रिपद देऊन गौरव केला. परंतू, या उपकारातून उतराई होण्याचे सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवण्यासाठी खोक्याचा मार्ग अवलंबला. हे फार काळ टिकणार नाही, त्यामुळे जनतेच्या मनातून उतरलेल्या ४० गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनी लढा उभारावा लागेल, असा इशारा आमदार भास्‍कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार जाधव म्‍हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा करारीपणा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होता. त्यांच्याच नातवाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना पक्ष, शिवधनुष्य, पक्षाची सत्ता आणि पक्षप्रमुखांचे मुख्यमंत्री पद घालवले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची ही चोरी केली.

ग्रामपंचायत निवडणुकीत मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली जास्त ग्रामपंचायती आल्या असून, ते म्हणतात मी जनमत कोणाकडे आहे हे दाखवून दिले, याबाबत विचारले असता जाधव म्हणाले, ‘‘ठाकरे सरकारने मंजुरी दिलेल्या कामांची ही गद्दार मंडळी भूमिपूजन व उद्‍घाटन करत आहेत.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Patan : देसाईंचे आजोबा थोर, पण हे चोर निघाले...भास्कर जाधवांचा घाणाघात

ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक संदर्भ असतात. त्यामुळे धनशक्ती, दहशत व सत्ता वापरून हा विजय मिळालेला आहे.’’ अधिवेशनात मंत्री देसाई यांनी अनेक खात्यांची उत्तर दिली, याबाबत छेडले असता; पण त्या उत्तरात दम नव्हता. अभ्यासपूर्वक उत्तर नव्हती, अशी टिप्पणी भास्कर जाधव यांनी केली.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Satara News : सातारा मेडिकल कॉलेजमधील भंगार विक्रीचा मुद्दा विधानपरिषदेत; आता होणार चौकशी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com