Satara : ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली... शंभूराज देसाई

Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंना कधी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे नव्हते. पण, सत्तेसाठीतुम्ही त्यांच्यासोबत गेला, असेही ते म्हणाले.
Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Bhaskar Jadhav, Shambhuraj Desaisarkarnama

Satara News : किती दारे सोडून भास्कर जाधव Bhaskar Jadhav हे शिवसेनेत Shivsena गेलेत. तुमचा हा नेमका कितवा पक्ष आहे, असा प्रश्न करुन मातोश्रीवर अपमान होतो,भेट मिळत नाही, ताटकळत ठेवले जाते, असे बरेच काही श्री. जाधव बोलले होते. आता आमच्या ५० आमदारांवर ते बोलत असून आम्हाला चोर म्हणता पण, आताची ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवली आहे. त्यांनी आमच्यावर बोलताना आपण स्वत: धुतल्या तांदळा सारख आहोत का हे पहावे, असा टोला राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी लगावला.

भास्कर जाधवांच्या टीकेवर शंभूराज देसाई म्हणाले, तुमचा हा नेमका कितवा पक्ष आहे, किती दारे सोडून ते ठाकरे सेनेत आले आहेत. सुरवातीला शिवसेनेत होते. त्यावेळी शिवसेना सोडताना ते काय बोलले हेही आमच्या लक्षात आहे. आमचा मातोश्रीवर अपमान होतो, आम्हाला भेट मिळत नाही, ताटकळत ठेवले जाते, काय काय बोलले ते आम्हाला माहिती आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले.

त्यावेळी त्यांचे एक भाषण आजही माझ्या लक्षात आहे. त्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंच्या आवाजाची कुचेष्टा केली होती. आता ते आमच्याबद्दल व ५० अमदारांबददल बोलतात. त्यांनी टीका करावी पण हे बोलताना आपण धुतल्या तांदळा इतके स्वच्छ आहाोत का ते पहावे. वेळ आल्यावर एखाद्या सभेत भास्कर जाधव यांचा प्रवास आम्ही नक्की जनतेसमाोर आणू.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून  मंत्री शंभूराज देसाईंना नववर्षाची  अनोखी भेट..!

राष्ट्रवादीत असताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याविषयी भास्कर जाधव काय बाोलले हाोते हेही माहित आहे. आता आम्हाल चोर म्हणता पण, आताची ठाकरे सेना तुम्हीच राष्ट्रवादीच्या मांडीवर बसवली आहे. नागपूरच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आमची ही राष्ट्रवादीची शिवसेना आहे. त्यावेळी भास्कर जाधवांनी त्याला दुजोरा दिला होता.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Winter Session : शंभूराज देसाईंवर विरोधकांनी केलेले 'आठ' आरोप कोणते?

आपण काय बोललो याचा विचार करावा. आम्ही बाळसाहेबांचे विचार घेऊन चाललो आहोत. ते विचार तुम्ही राष्ट्रवादीच्या घरात नेऊन कुलुपबंद करुन ठेवले आहेत. बाळासाहेब ठाकरेंना कधी काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे नव्हते. पण, सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेला, आम्हाला अधिक बोलायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला.

Bhaskar Jadhav, Shambhuraj Desai
Patan : देसाईंचे आजोबा थोर, पण हे चोर निघाले...भास्कर जाधवांचा घाणाघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com