Bharat Jodo Yatra म्हणजे तमाशा : विखे पाटलांची कडवट टीका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही.
 Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

सोलापूर : भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा म्हणजे एक तमाशा आहे. स्वतःचं अस्तित्व हरवलेले नेतृत्व म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi) आहेत, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. (Bharat Jodo Yatra is a spectacle : Radhakrishna Vikhe Patil)

पालकमंत्री विखे पाटील हे शुक्रवारी (ता. १८ नोव्हेंबर) सोलापूरच्या दौऱ्यावर हेाते. त्यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रा आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की राहुल गांधी म्हणजे स्वतःच अस्तित्व हरवलेले नेतृत्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार राहुल गांधी यांना नाही. त्यांच्या वक्तव्याचा निषेध आम्ही निषेध करतो. राहुल गांधी बेताल वक्तव्य करत आहेत. मात्र, भारत जोडो म्हणजे केवळ एक तमाशा आहे.

 Radhakrishna Vikhe Patil
राष्ट्रवादीच्या नेत्यावर मेहेरबानी दाखवणे भोवले : दौंडच्या पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

काँग्रेस पक्षाची दुरवस्था का झाली? एकेकाळी देशावर अधिराज्य गाजवणारा पक्ष आज विरोधी पक्षनेता होण्यासाठी तेवढे संख्याबळ मिळवू शकत नाही. पक्षाची ही अवस्था का झाली, याचा विचारही काँग्रेसच्या नेतेमंडळींनी करावा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांची करमणूक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनेच्या माध्यमातून भारत भारत जोडण्याचे काम केले आहे, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

 Radhakrishna Vikhe Patil
धनंजय मुंडेंना मोठा दिलासा : पंकजांना पुन्हा देणार आव्हान

कोरोना काळात महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. त्या काळात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र जोडण्यासाठी कोणते काम केले, असा सवाल करत महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेसने पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारू स्वस्त केली होती, असा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in