भानुदास मुरकुटे म्हणाले, युवा पिढीने ‘अशोक’ चा इतिहास जाणून घेतला पाहिजे...

या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे ( Karan Sasane ) यांच्या लोकसेवा विकास आघाडी विरुद्ध शेतकरी संघटना पॅनल अशी सरळ लढत आहे.
Bhanudas Murkute, Shrirampur
Bhanudas Murkute, ShrirampurSarkarnama

श्रीरामपूर ( जि. अहमदनगर ) : अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे ( Bhanudas Murkute ) व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक करण ससाणे ( Karan Sasane ) यांच्या लोकसेवा विकास आघाडी विरुद्ध शेतकरी संघटना पॅनल अशी सरळ लढत आहे. Bhanudas Murkute said that the younger generation should know the history of 'Ashoka'.

या निवडणुकीसाठी लोकसेवा विकास आघाडीने उंदिरगाव येथे दादासाहेब औताडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभेचे आयोजन केले होते. या सभेत माजी आमदार मुरकुटे यांनी अशोक सहकारी साखर कारखान्यात 34 वर्षांत केलेल्या कामाची माहिती दिली.

Bhanudas Murkute, Shrirampur
श्रीरामपूरसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे आले एकत्र

भानुदास मुरकुटे म्हणाले, आजच्या युवा पिढीने ‘अशोक’ चा इतिहास जाणून घेतला पाहिजे. 1987 मध्ये आम्ही अशोक कारखान्याची सूत्रे हाती घेतली. त्यावेळी कारखाना कार्यक्षेत्रात अवघा 36 हजार टन ऊस उपलब्ध होता. ऊस टंचाईच्या संकटामुळे कारखाना चालेल की नाही अशी स्थिती होती. पण आम्ही निर्धाराने कार्यक्षेत्रात अशोक बंधारे प्रकल्प राबवून तसेच पुढे आमदारकीच्या माध्यमातून गोदावरी व प्रवरा नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची मालिका उभारुन जलसंवर्धनाचे काम तडीस नेले. त्यामुळेच कारखाना ऊसाबाबत स्वावलंबी बनून आज स्थिरस्थावर झाल्याचे भानुदास मुरकुटे यांनी सांगितले.

मुरकुटे पुढे म्हणाले की, कारखाना उसाबाबत स्वावलंबी करतानाच डिस्टीलरी, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मितीसह वीज प्रकल्पही उभारला. कारखाना सलग्न संस्थांच्या माध्यमातून पॉलिटेक्निक कॉलेज, अशोक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, सी.बी.एस.सी. पॅटर्नचे स्कूल, आय.टी.आय., असे शैक्षणिक संकुले उभे करुन कारखान्याला सर्वकष प्रगतीच्या वाटेवर आणल्याचे मुरकुटे म्हणाले.

Bhanudas Murkute, Shrirampur
अशोक कारखाना निवडणुकीत सासरा विरुद्ध सून असा सामना रंगणार

करण ससाणे म्हणाले की, मुरकुटे यांनी अशोक कारखाना नीटनेटका चालविला आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध न करता तालुक्याच्या हितासाठी आम्ही निवडणूक न लढविता मुरकुटे यांना बिनशर्त पाठींबा देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, भीमभाऊ बांद्रे, सोपानराव नाईक आदींची भाषणे झाली. माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले. यावेळी माजी संचालक दिगंबर शिंदे, बबनराव मुठे, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, पंचायत समिती सदस्या वैशाली मोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब नाईक, राजेंद्र पाऊलबुद्धे, लक्ष्मणराव सरोदे, दादासाहेब पाऊलबुद्धे, नानासाहेब ताके, बाळासाहेब आढाव, विनायक भालदंड, बाळासाहेब पडोळे, बाबासाहेब नाईक, मंगल पवार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com