अकोलेतील राजकीय विरोधक भांगरे-पिचड आले एकत्र

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते मधुकर पिचड ( Madhukar Pichad ), माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावर एकत्र आले आहेत.
Ashok Bhangare & Vaibhaw Pichad

Ashok Bhangare & Vaibhaw Pichad

Sarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अकोले नगर पंचायत निवडणुकीत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट दिसून आली. आमदार डॉ. किरण लहामटे व ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांच्यातील धुसफुस चव्हाट्यावर आली. त्यामुळे सामाजिक कामाच्या नावाखाली अशोक भांगरे व भाजपचे नेते वैभव पिचड एकत्र आले आहेत. Bhangre-Pichad came together in Akole

तीव्र राजकीय मतभेद असलेले भाजपचे माजी आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे आदिवासींच्या सामाजिक, धार्मिक प्रश्नावर एकत्र आले आहेत. दोन्ही नेते आज घोरपडा देवी मंदिरात झालेल्या खासगी कार्यक्रमा निमित्त एका व्यासपीठावर आले होते. त्यांनी कार्यक्रमापूर्वी एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी केली. कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही नेत्यांनी मंदिरात एकत्र चर्चा केली.

Ashok Bhangare & Vaibhaw Pichad

शरद पवार, मधुकर पिचड, गावित असे नेते चौदा किलोमीटर चालत त्या गावात पोहोचले होते..

भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते मधुकर पिचड ( Madhukar Pichad ) म्हणाले, सध्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये फुट पाडून गैरसमज पसरविण्याचे काम होत असून दशक्रियविधी करायचे नाही, देव देवता मान्य नाही, अखंड हरिनाम सप्ताह करायचा नाही, असे अनेक मुद्द्यांवर आदिवासी समाजाला संभ्रमात पाडून धार्मिक आध्यात्मिक प्रश्नावर तसेच आदिवासी हक्काच्या प्रश्नावरून लक्ष विचलित केले जात असल्याने मधुकर पिचड यांनी या प्रश्नावर कडाडून टीका केली. आदिवासी समाजाने कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता योग्य पद्धतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Ashok Bhangare & Vaibhaw Pichad

अशोक भांगरे म्हणाले, स्वस्त धान्य काळा बाजार प्रकरणातील सूत्रधार शोधा...

समाजाने पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आव्हान केले होते. तालुक्यात व राज्यात आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला बिरसा ब्रिगेड करत असलेल्या कामाबद्दल कल्पना देऊन सामाजिक व धार्मिक आध्यात्मिक बाबत मार्गदर्शन केले.त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी रंधा येथे सामाजिक कार्यक्रमा निमित्त अशोक भांगरे वैभव पिचड उपस्थित होते.

या प्रसंगी भांगरे व पिचड यांनी आदिवासींच्या प्रश्नांवर एकत्र येण्याचे ठरविले असून लवकरच सामाजिक प्रश्नावर राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर मेळाव्याचे आयोजन करून आदिवासी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले जाणार आहे.

आदिवासींच्या प्रश्नावर भांगरे-पिचड एकत्र आले असून आमदार डॉ.किरण लहामटे व शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर तळपाडे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर ही सहमती राजकीय नसेल ना ?अशीही चर्चा अकोलेमध्ये सुरू आहे. आमदार लहामटे यांच्या एकांगी भूमिकेमुळे भांगरे नाराज असून येणाऱ्या निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जनतेला मनस्ताप होत असताना भांगरे यांचीही तीच अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.

Ashok Bhangare & Vaibhaw Pichad

वैभव पिचड म्हणाले, आमदार करणाऱ्यांचा अपमान करणाऱ्यांविषयी मी काय बोलू...

सामाजिक प्रश्नांबाबत आमचे एकमत असून राजकीय पक्षाचे काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. समाजाच्या हितासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. आजही या वयात ते काम करत आहेत. ज्येष्ठ नेते भांगरे आमच्या मताशी सहमत आहेत याचा आनंदच आहे.

- वैभव पिचड, माजी आमदार, भाजप.

आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या देव धर्म पारंपारिक चालीरीती जोपासत आला आहे. वर्षानुवर्षे तो महादेवाला मानतो तसेच प्रत्येक आदिवासी गावात मारुती, श्री विठ्ठल मंदिर आहे. या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह बसविला जाऊन त्यातून आध्यात्मिक संस्कार जोपासला जातो. त्या परंपरेला कुणी छेद देत असेल तर मान्य होणार नाही. माजी मंत्री मधुकर पिचड माजी आमदार वैभव पिचड यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी असलो तरी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकत्र येऊन प्रश्नाची सोडवणूक करू.

- अशोक भांगरे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in