भगिरथ भालकेंनी शब्द फिरवला; ऊसबिल देण्याआधीच उमेदवारी अर्ज भरला!

कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मात्र सहकारी संस्था गट आणि सरकोली ऊस उत्पादक अशा दोन गटांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भगिरथ भालकेंनी शब्द फिरवला; ऊसबिल देण्याआधीच उमेदवारी अर्ज भरला!
Bhagirath BhalkeSarkarnama

पंढरपूर : शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले आणि कामगारांचे वेतन दिल्याशिवाय मी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी जाहीर केले होते. परंतु ऐनवेळी भालकेंनी शब्द फिरवला आहे. शेतकऱ्यांची ऊसबिले देण्यापूर्वीच त्यांनी स्वतःचे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ऐन निवडणुकीत भालकेंनी सभासदांना दिलेला शब्द फिरवल्याने त्याची उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे. (Bhagirath Bhalke filed his candidature for the Vitthal Sugar Factory election )

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भगिरथ भालकेंकडे विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपद देण्यात आले. दोन अडीच वर्षांपासून भगिरथ भालके विठ्ठलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या काळातील अजूही उसबिले आणि तोडणी वाहतूक ठेकेदारांची बिले थकीत आहेत. थकीत ऊस बिले मिळावीत, यासाठी मागील अनेक दिवसांपासून शेतकरी हेलपाटे मारत आहेत. परंतु अद्याप शेतकऱ्या पैसे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या वाढत्या दबावामुळे मागील काही दिवसांपासून भगिरथ भालके संपर्कातदेखील नव्हते.

Bhagirath Bhalke
जानकरांच्या आमदाराचा भाजपला शॉक : ‘आम्हाला गृहीत धरू नका!’

अलीकडेच भगीरथ भालके यांनी विठ्ठलच्या सभासदांची थकीत ऊसबिल दिल्याशिवाय मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी स्वागतदेखील केले होते. शेतकऱ्यांना ऊस बिले मिळतील, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी शेवटपर्यंत निराशाच पडली. मागील आठ दिवसांपूर्वी दाते मंगल कार्यालयात भालके-काळे गटाची निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय बैठक बोलावली होती.

Bhagirath Bhalke
लग्नाला म्हणून आला अन्‌ कोर्ट परिसरात येऊन पत्नीचा काटा काढला!

या बैठकीत रोपळे येथील सभासद जनक भोसले यांनी व्यासपीठावर जावून ऊसबिल देण्याची मागणी केली होती. त्यावेळी सभेत मोठा राडा झाला होता. सभासद भोसले यांना भालके-काळे गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली होती. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता. या घटनेची दखल घेवून उस बिले देतील, अशी शक्यता होती. परंतु अद्याप थकीत पैसे देण्याविषयी भालके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीच भूमिका स्पष्टपणे जाहीर केले नाही. त्यामुळे सभासद आणि कामगारांमध्ये सत्ताधारी संचालक मंडळाविषयी नाराजी आहे.

Bhagirath Bhalke
परिचारकांनी वाढविले समाधान आवताडेंचे टेन्शन; इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश!

कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी मात्र सहकारी संस्था गट आणि सरकोली ऊस उत्पादक अशा दोन गटांमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे थकीत ऊस बिले दिल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरणार नाही, असा सभासदांना दिलेला शब्द भगिरथ भालके यांनी सोयस्करपणे फिरवल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरु आहे. हा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजण्याची शक्यताही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in