भगिरथ भालके सक्रीय झाले अन्‌ केला मोठा गौप्यस्फोट!

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगिरथ भालके कामाला लागले आहेत.
Bhagirath Bhalke
Bhagirath BhalkeSarkarnama

पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव आणि विठ्ठल कारखान्यावर आलेल्या आर्थिक संकटानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) हे पंढरपुरातून गायब होते. मात्र, सोलापूर जिल्हा दूध संघ, पंढरपूर आणि मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भालके हे पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी सरकोलीत बैठक घेत भालके गटाला चार्ज करण्याबरोबरच पंढरपूर (Pandharpur) नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाचे मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. (Bhagirath Bhalke active on background of Pandharpur Municipal Council election)

प्रदीर्घ कालावधीनंतर भगिरथ भालके हे मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. सोलापूर जिल्हा दूध संघाच्या बिनविरोध निवडणुकांच्या बैठकीला ते उपस्थित होते. त्यानंतर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कामाला लागले आहेत. युवराज पाटील आणि गणेश पाटील यांच्यासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी भालके गटाची सरकोली येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीत नगरपालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश त्यांनी दिले. याच बैठकीत त्यांनी पंढरपूर नगरपालिका संपूर्ण ताकदीने लढविण्याचे ठरविले आहे. भालके हे पुन्हा सक्रीय झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनपट्टे यांनी दिली.

Bhagirath Bhalke
मोहिते पाटलांची साथ सोडून शिंदेंच्या गोटात सामील होऊनही उमेदवारीत डावलले :समर्थकांचा आमदारांवर रोष

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकोलीत भालके गटाची बैठक झाली. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सर्व कार्यकर्ते भगिरथ भालके यांच्याशी फक्त फोनवरून संपर्कात होतो. मात्र, आमची आता बैठक झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी सर्वांनी मिळून नगरपालिका लढवण्याचा प्रयत्न असणार आहे. पण, पक्षाच्या आदेशानुसार काम करण्यात येणार आहे. नगरपालिकेवर आपल्याला राष्ट्रवादीचा झेंडा फडकावयचा आहे. तसेच नगरपालिकेतील सत्ताधारी गटाचे मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोटही भगिरथ भालके यांनी बैठकीत केल्याचे या वेळी बनपट्टे यांनी नमूद केले.

Bhagirath Bhalke
बबनदादा-सोपलांना निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश : सत्ताधारी-बचाव समिती आमने-सामने

नगरपालिकेची निवडणूक ताकदीने आणि जोमाने लढायची आहे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पाठबळ मिळणार आहे. या बैठकीला नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, माजी नगरसेवक मोहंमद वस्ताद, अनिल अभंगराव, धनु कोताळकर यांच्यासह पक्षाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, पंढरपुरात लवकरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com