Sushma Andhare News : शरद पवारांमुळेच माझं कुटुंब सुरक्षित, सुषमा अंधारे ढसाढसा रडल्या..

Sushma Andhare News : एक फोन केला अन सहा तासात मी पवारांपुढे हजर होते.
Sushma Andhare News : Sharad Pawar
Sushma Andhare News : Sharad PawarSarkarnama

Satara News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare News) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच ढसाढसा रडल्या. पवारांसमोरच भाषण करताना, सुषमा अंधारे यांनी पवारांची आपल्याला कशाप्रकारे मदत झाली, याची एक आठवणही सांगितली. यावेळी अंधारे भावुक झाल्या होत्या. पवारांमुळेच माझं संपूर्ण कुटुंब आज सुरक्षित आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. सातारा इथे भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Sushma Andhare News : Sharad Pawar
Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं पाऊल; घेतला 'हा' निर्णय!

या कार्यक्रमात भाषण करत असताना अंधारे म्हणाल्या, “इथे राजकारणाचा विषयच येत नाही, पण यावेळी मला आवर्जून सांगायची गरज वाटते की, माझ्यावर अश्लाघ्य भाषेत आमदार टीपण्णी करतात. मात्र यानंतरही एका पोलिस स्थानकात तक्रार लिहून घेतली जात नाही. सभागृहीत विरोधी पक्षाच्या बाकावर म्हणून आपण बसतो. तेव्हाही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी माझ्याबद्दल केल्या गेलेल्या अश्लाघ्य टीपण्णीबद्दल तक्रार का नोंदवली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.

"माझं काही चुकत असेल तर तुम्ही माझं कान पकडा, मी यासाठी लाख वेळा माफी मागायला तयार आहे. मी तुमच्याकडे एका हक्काने बोललं पाहिजे. शरद पवार यांना लोक आधरवड म्हणतात, त्यांनी राजीनामा दिला त्या दिवशी त्यांना मी पत्र लिहले आहे. आज तेच पत्र पुन्हा वाचून दाखवते," असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

"खरंतर मी शरद पवारांना काही लिहावं, काही सांगावं एवढी काय माझी प्रज्ञा निश्चित नाही. परंतु, फक्त पक्ष म्हणून नाही, तर महाराष्ट्र राज्यातील बहुजन, उपेक्षित, तळागाळातील अठरापगड जातीची बुज असणाऱ्या नेत्याचा राजीनामा कुणालाही मानवणारं नाही, असंही अंधारे यांनी यावेळी सांगितलं.

Sushma Andhare News : Sharad Pawar
BJP News : पुण्याच्या माजी महापौरांवर कठीण जबाबदारी; गडकरी-फडणवीस अन् बावनकुळेंच्या ‘होम ग्राऊंड’वर निवडणूक प्रभारी!

शरद पवारांमुळेच माझं कुटुंब सुरक्षित :

“मी सभागृहामध्ये सांगू शकणार नाही, इतकं शरद पवार यांनी माझ्यासारखी तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केलं आणि काय नाही. शरद पवार यांच्यामुळेच माझं पूर्ण कुटुंब आज सुरक्षित आहे. अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले. मात्र जेव्हाही मी शरद पवारांना मेसेज केला, तेव्हा त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी नेहमी मोठ्याभावासाखा मला फोन केला. माहिती शरद पवारांपर्य़ंत (Sharad Pawar) पोहचवला. मी एक फोन केला आणि पुढच्या सहा तासात शरद पवार यांच्यापुढे हजर होते, असेही अंधारे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com