माझ्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार पडला अन्‌ तेव्हापासून माझ्यावर गुन्हे दाखल होऊ लागले

गृहराज्यमंत्री देसाई यांनी विधान परिषदेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली : पडळकर
Gopichand Padalkar

Gopichand Padalkar

sarkarnama

मुंबई : विधानसभेची २००९ ची निवडणूक मी खानापूर-आटपाडीतून लढवली होती. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा (ncp) उमेदवार होता आणि त्याला १७ इच्छुकांचा पाठिंबा होता, त्यामुळे ते उमेदवार आपण निवडून येणार, अशा अर्विभावात होते. मात्र, त्या निवडणुकीत मला १९ हजार मते मिळाली आणि माझ्या मतामुळे राष्ट्रवादीचा निवडून येणारा उमेदवार पडला आणि तेथून माझ्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत आपल्या हल्ल्यासंदर्भातील प्रश्नावर राजकीय सूडबुद्धीने उत्तर दिले, असे सांगून जेव्हा जेव्हा प्रस्थापितांचे सरकार येते, तेव्हा तेव्हा माझ्यावर गुन्हे दाखल होतात, असा दावाही आमदार पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

Gopichand Padalkar

‘गोपीचंद पडळकरांच्या इशाऱ्यावरून जानकरांच्या अंगावर गाडी घातली....’

पडळकर म्हणाले की, गृहराज्यमंत्री देसाई यांनी विधान परिषदेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे. मेटकरी नावाच्या सांगली जिल्हा बॅंकेच्या मतदाराला माझा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनी ‘आमच्या उमेदवाराला मतदान का करत नाही,’ अशी विचारणा करणारा फोन केला होता, असे देसाई यांनी म्हटले आहे. पण, जिल्हा बॅंकेच्या मतदार यादीत मेटकरी नावाचा एकही सभासद नाही. तसेच, ज्याने तक्रार केली आहे, तो जानकर हा खानापूर तालुक्यातील आहे, त्याचा आटपाडीशी काहीही संबंध नाही. मेटकरी यांना सकाळी अकरा वाजता माझ्या भावाने मारले होते, तर त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवालही त्यांनी केला.

Gopichand Padalkar

रोहिणी खडसेंवरील हल्ला; सेनेच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हल्ल्यासंदर्भातही चुकीची माहिती सभागृहात दिली गेली आहे, असा दावा आमदार पडळकर यांनी केला. त्यासाठी त्यांनी स्टेशन डायरीतील नोंदी वाचून दाखवल्या. त्यात म्हटले आहे की, पोलिस स्टेशनसमोर २०० ते २५० लोकं जमले होते. त्यांनी पडळकर यांच्यावर हल्ला केला आहे, त्यावेळी पडळकरांची गाडी तेथून जात असताना जमावातील काही लोक जखमी झाले असून काही दुचाकी गाड्याही चिरडल्या आहेत. असे असताना विधीमंडळात मात्र मीच चालकाला ह्याच्या अंगावर गाडी घाल, असे सांगितल्याची चुकीची माहिती दिली आहे.

Gopichand Padalkar

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रात धमकीचा सूर; राज्यपालांचं खरमरीत पत्र

स्टेशन डायरीत एक नव्हे तीन डंपर आहेत. त्यात काट्या आणि दगड होते. हे तीनही डंपर तेथे थांबून होते आणि विधीमंडळात सांगितलं गेलंय की डंपर रस्त्याने जात होता. जो आरोपी आहे, त्याच्याच नावावर हे डंपर आहेत. तसेच, आरोपीच्या गाडीत सोडा वॉटरच्या बॉटलही सापडल्या आहेत. पण, सभागृहाची दिशाभूल केली जात आहे, असेही पडळकर यांनी नमूद केले.

आपल्यावरील दाखल गुन्ह्यासंदर्भात बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी मी जयंत पाटील यांची गाडी आडवली होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कऱ्हाडच्या टेंभूच्या कार्यालयात शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आंदोलन केले होते, त्यावेळी माझ्यावर ३५३ चा गुन्हा दाखल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in