Khatav : निवडणुकीपुरते येणाऱ्यांपासुन सावध रहा : बाळासाहेब पाटलांचा धैर्यशील कदमांना टोला

आपल्याकडे जनमत नाही हे शिंदे-फडणवीस सरकारला Shinde-Fadanvis Government माहित आहे, त्यामुळे निवडणूक Election घेण्याचं धाडस सरकार करत नाही, असा आरोप आमदार पाटील Balasaheb Patil यांनी केला.
Balasaheb Patil, Dhairyashil kadam
Balasaheb Patil, Dhairyashil kadamsarkarnama

कऱ्हाड : आम्ही निवडणुकीपुरते येत नाही. पण, अलीकडे एक पध्दत सुरु झाली आहे. निवडणुका आल्या की आम्ही हे काम आणलं, ते काम आणलं असा दिंडोरा पिटायचा. निव्वळ लोकांची दिशाभुल करायची. त्यामुळे अशा प्रवृत्तीपासुन जनतेने सावध राहावे, असा टोला आमदार बाळासाहेब पाटील यांनी धैर्यशील कदम यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

पुसेसावळी (ता. खटाव) परिसरातील लक्ष्मीनगर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, शिवाजी सर्वगोड, शिवाजीराव शिंदे, धनाजी पावशे, सुरेश पाटील, सरपंच दत्तात्रय रुद्रुके आदी उपस्थिती होते.

आमदार पाटील म्हणाले, सरकारने विकास कामांना दिलेल्या स्थगित्या उठवून सर्वसामान्य जनतेसाठी काम करावे. एखाद्या विकास कामाचा उपयोग हा लोकप्रतिनिधीला होत नसून, तो सर्वसामान्य जनतेला होत असतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, नगरपालिका, नगरपालिका आदींवर प्रशासक आहेत. त्यामुळे लोकांना अडचण निर्माण होत आहे. आपल्याकडे जनमत नाही हे सरकारला माहित आहे, त्यामुळे निवडणूक घेण्याच धाडस सरकार करत नाही.

Balasaheb Patil, Dhairyashil kadam
Satara : बाळासाहेब पाटलांचा देसाईंना सल्ला... सत्ता येईल हे गृहित धरू नये...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in