Patan : निवडणुकांपुरते मतदारसंघात फिरणाऱ्यांपासून सावध राहा : शंभूराज देसाई

विरोधक पाठीमागून आरोप करताहेत Opponents make accusations behind the scenes. मात्र, त्यांना आव्हान आहे. पाठीमागे बोलण्यापेक्षा समोरासमोर व्यासपीठावर या Come to the platform face to face , असा इशाराही मंत्री देसाई Shambhuraj Desai यांनी दिला.
Shambhuraj Desai, Satyajit Patankar
Shambhuraj Desai, Satyajit Patankarsarkarnama

तारळे : जे दोन वेळा पराभूत झाले, ते मतदारसंघात पुन्हा दिसलेत का, असा प्रश्न उपस्थित करून आता निवडणुका असल्याने ते पुन्हा फिरताना दिसतील. त्यामुळे अशापासून सावध राहा. आपल्या पाठीशी राहणाऱ्या, विकासकामे करणाऱ्या प्रतिनिधीला निवडून देण्याचे कर्तव्य करा, असे स्पष्ट मत राज्य उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

तारळे (ता. पाटण) येथे नऊ कोटी ३५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

येत्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा आणि सुसज्ज आरोग्य केंद्र उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विभागात जिल्हा परिषद, पंचायत समितीला नेमका कशाचा फेरा येतो, हे कळेना. शंभूराजांची माणसे पडली, तरी विकासकामे सोडली नाहीत. खारीक, खोबरं, गुलालाला लोक भाळतात. निवडणुकीपुरते १५ दिवस येणाऱ्यांना ओळखा.’

Shambhuraj Desai, Satyajit Patankar
Satara : ४८ तासांचे सरकार केलं, ती बेईमानी नव्हती का... शंभूराज देसाई अजितदादांवर बरसले

प्रत्येक आरोपाचे उत्तर देऊ...

विरोधक पाठीमागून आरोप करताहेत. मात्र, त्यांना आव्हान आहे. पाठीमागे बोलण्यापेक्षा समोरासमोर व्यासपीठावर या, तुमच्या प्रत्येक आरोपाचे, प्रश्नाचे उत्तर देऊ, असे सांगत मंत्री देसाई यांनी आम्ही शिवसेना सोडली नसून शिवसेनेतच आहोत, असा पुनरुच्चार केला.

Shambhuraj Desai, Satyajit Patankar
पाटण : बाळासाहेबांची शिवसेना जोमात... राष्ट्रवादी कोमात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in