तुमच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांनी मातोश्रीचे उंबरे झिजवले, याची जाणीव ठेवा....

सर्वसामान्य शिवसैनिक Shivsena Supporters याचा जाब तुम्हाला नक्की विचारेल आणि आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा प्रताप जाधव Pratap Jadhav यांनी दिला.
Mahesh Shinde, Pratap Jadhav
Mahesh Shinde, Pratap Jadhavsarkarnama

विसापूर : कोरेगाव- खटाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी शिवसेनेतून अनेक निष्ठावान कार्यकर्ते इच्छुक असताना आम्ही निष्ठावान शिवसैनिकांनी मातोश्रीवर शिफारस करून तुमच्या उमेदवारीचा आग्रह धरला ही आमची चूक झाली का? अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसैनिकांच्या मागणीनुसार आपण मतदारसंघात किती रुपयांचा विकास निधी टाकला. शिवसेनेचे आमदार म्हणून मतदारसंघात आपण शिवसेना मजबूत करण्याचे काम केले का? असा सवाल उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार महेश शिंदे यांना विचारले.

प्रताप जाधव यांनी पत्रकात पुढे म्हटले की, ‘‘खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असणारी जिहे-कटापूर योजना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून युती सरकारच्या काळात मंजूर झाली. खटाव तालुक्यातील शिवसैनिकांनी जिहे-कटापूर योजनेसाठी वेळोवेळी आंदोलने, पदयात्रा व तत्कालीन सरकारच्या विरोधात जन आंदोलने उभारली होती. त्यामुळे या योजनेस हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाव द्यावे, असा ठराव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मंजूर केला होता; परंतू, आपण शिवसेनेचे आमदार असूनही यास सहमतीही दर्शवली नाही.’’

Mahesh Shinde, Pratap Jadhav
कोरेगावात महेश शिंदे समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

विधानसभेची उमेदवारी आपणास मिळावी, म्हणून मतदारसंघातील शिवसैनिकांनी मातोश्रीचे उंबरे झिजविले. याची जाणीव ठेवणे सोडाच याउलट आपण मतदारसंघात गावागावांत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात गट स्थापन करून शिवसैनिकांना अपमानास्पद वागणूक दिली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला.

Mahesh Shinde, Pratap Jadhav
त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही... अरूणाताई बर्गे

मात्र, मतदरसंघातील विकासकामे करताना मूळ सैनिकांना आमदार महेश शिंदे यांनी सवतीची वागणूक दिली. शिवसेना आणि शिवसैनिकांनी मतांच्या आणि विकासकामांच्या निधीच्या रूपाने तुम्हाला भरभरून दिले, तरीही तुम्ही शिवसेनेशी व पक्ष नेतृत्वाशी फारकत घेतली. येणाऱ्या काळात सर्वसामान्य शिवसैनिक याचा जाब तुम्हाला नक्की विचारेल आणि आपली ताकद दाखवून देईल, असा इशारा श्री. जाधव यांनी दिला.

Mahesh Shinde, Pratap Jadhav
Video : माजी शिवसेना आमदार यांचा उद्धव ठाकरे याना थेट सवाल

आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अडीच वर्षांत शिवसेनेची एकही शाखा काढली नाही. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलून भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम महेश शिंदे यांनी केले आहे.

- प्रताप जाधव (शिवसेना उपजिल्हाप्रमुख)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com