Bazar Samiti Election : थोरात-विखेंची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या संगमनेर बाजार समितीत ९७ टक्के मतदान!

APMC Election : कोण पडणार कोणावर भारी, थोरात की विखे मारणार बाजी?
Sangamner Bazar Samiti Election :
Sangamner Bazar Samiti Election : Sarkarnama

Sangamner Bazar Samiti Election : जनतानगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorath) यांच्या एकछत्री अंमलाखाली सहकारात मापदंड ठरलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज झालेल्या मतदान प्रक्रियेत चार मतदार संघातून एकूण ९७.१२ टक्के मतदान झाले आहे. शहरातील जनतानगर प्रभागातील राजमाता जिजाऊ प्राथमिक शाळा नं. ९ मधील मतदान केंद्र परिसर आज सकाळपासून मतदार, कार्यकर्ते व नेत्यांच्या उत्साहामुळे फुलला होता.

Sangamner Bazar Samiti Election :
Brijbhushan Singh : ब्रृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार, कुस्तीपटूंची अटकेची मागणी; आता लढाई आरपारची !

बाजार समितीच्या २०२३ ते २७ या पंचवार्षिक निवडणुकीत कृषी पतसंस्था आणी बहुउद्देशिय सहकारी संस्था मतदार संघाचे ११, ग्रामपंचायत मतदार संघातून ४, व्यापारी अडते मतदार संघातून २, तर हमाल मापाडी मतदार संघातून १ अशा १८ जागांसाठी झालेल्या मतदानात ४५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मात्र यावेळी झालेल्या निवडणूकीत थोरातांचे पारंपरिक विरोधक, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांच्या अधिपत्याखालील जनसेवा पॅनलच्या बॅनरखाली एकास एक सरस उमेदवार उभे राहिल्याने, एरव्ही सामान्य असलेल्या या मतदान प्रक्रियेत चुरस निर्माण झाली होती.

विखे गटाच्या उमेदवारांसह मतदान केंद्राजवळ आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, रणजितसिंह देशमुख, दुर्गा तांबे आदी उपस्थित होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह आलेला पाऊस व गारांनी मतदार व निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. मात्र तरीही मतदारांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून निकालाची उत्सुकता लागली आहे.

Sangamner Bazar Samiti Election :
Khed Bazar samiti Result : खेड बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम : मोहितेंसह १० जण विजयी; विरोधकांना ६ जागा

मतदान आकडेवारी -

सोसायटी मतदार संघ : एकूण मतदान १६७७ पैकी १६२४

ग्रामपंचायत मतदार संघ : १३८७ झालेले मतदान १३६८

हमाल मापाडी मतदार संघ : एकूण मतदान १४७ झालेले मतदान १४७

व्यापारी आडते मतदार संघ : ४०३ पैकी झालेले मतदान ३७१

एकूण मतदान : ३६१४

झालेले मतदान : ३५१०

मतदानाची टक्केवारी : ९७.१२

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com