भगवानगडसह 46 गावे पाणी योजनेवरून श्रेयवादाची लढाई

भगवानगडसह 46 गावे पाणी योजनेच्या मान्यतेवरून भाजप ( BJP ), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) व शिवसेनेत ( Shivsena ) श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
मोनिका राजळे, प्रताप ढाकणे

मोनिका राजळे, प्रताप ढाकणे

सरकारनामा

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( अहमदनगर ) : पाथर्डी तालुक्यातील भगवानगडासह 46 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 190 कोटी रुपये खर्चाच्या पाणीयोजनेला काल ( बुधवार ) मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली. मात्र, या योजनेच्या मान्यतेवरून भाजप ( BJP ), राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP )शिवसेनेत ( Shivsena ) श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या योजनेला मंजुरी मिळताच आज राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवीत आनंदोत्सव साजरा केला. Battle of credit for water supply to 46 villages including Bhagwangad

भगवानगडासह 46 गावांना जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करावा, अशी जुनी मागणी होती. या विषयावर एक समितीही स्थापन करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या टंचाई आढावा बैठकीत या विषयावर आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, समितीचे अध्यक्ष संजय बडे यांनी मुश्रीफ यांचे लक्ष वेधले होते.

मोनिका राजळे, प्रताप ढाकणे

मोनिका राजळे म्हणाल्या, सध्या काहींना निवडणुका जवळ आल्याने डोहाळे लागलेत...

काल मंत्रालयात मुश्रीफ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, सहसचिव अभिषेक कृष्णा, क्षितिज घुले, शिवशंकर राजळे, संजय बडे, बंडू बोरुडे, वैभव दहिफळे उपस्थित होते.

या कामासाठी पुढील वर्षात 15 जानेवारीपर्यंत निविदा काढली जाणार आहे. 20 फेब्रुवारीला प्रत्यक्षात कामास सुरवात केली जाईल, असे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले.

मोनिका राजळे, प्रताप ढाकणे

साईसंस्थानच्या अध्यक्षपदी प्रताप ढाकणे यांना संधी द्या, कोणी घातले शरद पवारांना साकडे

योजना मंजुरी संदर्भात आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, की 2017 मध्ये मी व माजी आमदार (स्व.) राजीव राजळे यांनी भगवानगड परिसर व 46 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना होण्यासाठी देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राम शिंदे, पंकजा मुंडे यांच्याकडे 10 मे 2017 रोजी पत्राद्वारे मागणी केली होती. योजनेच्या सर्वेक्षणासाठी 19 लाख रुपयांची निविदाप्रक्रिया झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला या योजनेच्या सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सर्वेक्षण व्यवस्थापन, आराखडा तयार करण्यासाठी पुरेसा निधी मिळण्यास विलंब होऊन, या योजनेचे काम संथ गतीने होत राहिले.

मध्यंतरी झालेले सत्तांतर व कोरोना लॉकडाउनमुळे कोणत्याच योजना मंजूर झाल्या नाहीत. 2021 पासून मी पुन्हा भगवानगड व 46 गावे पाणीपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला. त्यासाठी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, हसन मुश्रीफ, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरेंकडे पाठपुरावा केला. या योजनेसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करून कार्यवाही व्हावी, यासाठी प्रयत्न केले. ऑगस्टमध्ये पाटील यांनी बैठकही आयोजित केली होती, पण ती झालीच नाही. या बैठकीचे निमंत्रण मला एक आठवड्यापूर्वीच मिळाले होते. ही योजना मार्गी लावल्याबद्दल सहकार्य केलेल्या सर्व मंत्र्यांचे आभार मानत असल्याचे राजळे यांनी सांगितले.

मोनिका राजळे, प्रताप ढाकणे

भगवानगड पाणीयोजनेचे त्रांगडे ! राजळे - तनपुरे यांच्यात एकवाक्यता होईना

या योजने संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे म्हणाले, भगवानगड व 46 गावांना पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर करण्याचे काम आघाडी शासनाने केले आहे. इतरांनी त्याचे श्रेय घेऊ नये. या योजनेच्या मंजुरीसाठी मी व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी पाठपुरावा केला होता.

ढाकणे पुढे म्हणाले, की चार महिन्यांपूर्वी आपण व घुले यांनी ही योजना तालुक्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे, हे पालकमंत्री हसन मुश्रीफ व जयंत पाटील यांना सांगितले होते. ही योजना व्हावी, यासाठी आम्ही आग्रही असल्याने, या विषयावर बैठकसुद्धा घेण्यात आली होती. यानंतर या योजनेचे सर्वेक्षणसुद्धा करण्यात आले. त्यानंतर पुन्हा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी मुश्रीफ यांनी चर्चा करून, आज मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

मोनिका राजळे, प्रताप ढाकणे

'ऐकाल का, कराल का साध्य? पंकजा मुंडे यांचं भावनिक पत्र...

या बैठकीत ही योजना मंजूर झाली आहे. लवकरच योजनेच्या कामाला सुरवात होणार आहे. जे आज या योजनेच्या मंजुरीचे श्रेय घेऊ पाहत आहेत, त्यांनी मागील पाच वर्षांत युतीचे शासन असताना ही योजना का मंजूर केली नाही? उलट, योजना मंजूर केली असे म्हणत स्वतःचे कौतुक करून घेतले. ही योजना मंजूर व्हावी म्हणून मी जो पत्रव्यवहार केला, तो दाखवायला तयार आहे. योजनेचे श्रेय हे सध्याच्या आघाडी शासनाचे आहे. इतरांनी ते घेऊ नये, अशी टीका राजळे यांचा नामोल्लेख टाळून करीत ढाकणे यांनी आजच्या बैठकीस उपस्थित राहिलेल्या सर्व मंत्र्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com