मी काँग्रेसचा शहराध्यक्ष; पैसे दे नाही तर महिला अंगावर सोडेन : धमकी देत लाटली १८ लाखांची जमीन

काँग्रेसचे बार्शीचे माजी शहराध्यक्ष जीवनदत्त आरगडे व त्यांच्या पत्नीसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Congress
CongressSarkarnama

बार्शी (जि. सोलापूर) : नऊ वर्षांत पैसे दुप्पट देणारी कंपनी बंद पडताच कंपनीतील लिपिकास घेतलेले पैसे परत दे; अन्यथा तुझी जमीन माझ्या पत्नीच्या नावाने कर. नाही तर गुन्हा दाखल केल्यानंतर तू जेलमध्ये सडशील, अशी धमकी देऊन सुमारे १८ लाख रुपयांची जमीन कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्षाने लाटली आहे. या प्रकरणी बार्शी (Barshi) शहर पोलिस ठाण्यात काँग्रेसच्या (congress) माजी शहराध्यक्षांसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Barshi's congress's former president jeevandatta Argade file charged with fraud)

कॉंग्रेसचा माजी शहराध्यक्ष जीवनदत्त आरगडे, पत्नी निवेदिता आरगडे, एजंट शीला हिंगे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सतीष सुरेश जाधव (रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १० जानेवारी २०२२ रोजी घडली.

Congress
रघुनाथ कुचिक प्रकरण : वाघ यांनी बळजबरीने जबाब द्यायला लावल्याचा पिडीतेचा आरोप

बार्शी शहरातील आगळगाव रस्त्यावर सेक्युलर ॲग्रो ॲन्ड हेल्थकेअर प्रा. लि. ही फायनान्स कंपनी २०११ मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्या कंपनीत जाधव हे लिपिक होते, तर एजंट शीला हिंगे हिने ग्राहकांचे ७ लाख रुपये कंपनीमध्ये जमा केले होते. ही कंपनी २०१४ मध्ये बंद पडली आहे. कंपनीत भरलेले ७ लाख रुपयांचे १४ लाख रुपये झाले आहेत. ‘तू आता तुझी लक्ष्याचीवाडी येथील जमीन विकून ते पैसे परत दे. तसेच जमिनीचे १७ लाख ९० हजार रुपये होतात. उरलेले ३ लाख ९० हजार रुपये परत देतो, अशी धमकी दिली होती. जमीन विकून पैसे न दिल्यास निवेदिता आरगडे व शीला हिंगे यांनी जाधव यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.

Congress
"तिचं वागणं मला काही कळत नाही" : पिडीतेच्या आरोपांवर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

जीवनदत्त आरगडे याने पत्नी निवेदिताच्या नावावर जमीन कर; अन्यथा महिला तुझ्या अंगावर सोडेन. मी काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे. पोलिस ठाण्यात पैसे बुडवले म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. त्यानंतर तू कधीच जेलमधून सुटणार नाही. आलेल्या सर्व महिलांच्या पैशांचे मी पाहतो, असे सांगितले होते. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने १० जानेवारी २०२२ रोजी रजिस्टार कार्यालयात नेऊन त्यांनी मला कधीही पैसे दिले नसताना बनावट मसुदा तयार करुन माझ्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com