जिल्ह्यातून एक ते दीड कोटींचा हप्ता सोलापूरला जातोय; आमदार राऊतांचा गौप्यस्फोट

पंढरपूर, तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविकांची वाहने अडवून खंडणी वसूल केली जात असल्याचा आरोप आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी केला आहे.
Rajendra Raut
Rajendra RautSarkarnama

बार्शी : सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात अवैध व्यवसाय मटका, दारु, गुटखा, वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात जोमात सुरु आहे अन् विधानसभा सदस्यांनी तक्रारी केल्यातर त्यांना व त्यांच्या कुटुंबांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे, अशी लक्षवेधी सूचना बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी विधानसभेत (Maharashtra Assembly) मंगळवारी मांडली.

पंढरपूर, मंगळवेढा येथे अवैध व्यवसाय, वाळू तस्करी पोलिस बंदोबस्तामध्ये कशी चालते त्याविषयी आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांनी मांडली होती पण संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असून आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचेसह आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासन करीत आहे.

Rajendra Raut
अजितदादा कोण म्हणता मग, बारामतीत जाऊन शेपूट का घालता...

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, महासंचालक, महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक यांचेकडे तक्रारी केल्या आहेत पण कोणतेही अवैध व्यवसाय बंद होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बार्शी शहरात विधानसभा सदस्यांसोबत पोलिस निरीक्षकाने हुज्जत घातली होती ती व्हिडिओ क्लिप व्हायरल करुन आमदाराची कशी जिरवली अशी भाषा वापरली जाते. गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांची बैठक अकलूज येथे घेतली होती. त्यावेळीही तक्रार करण्यात आली होती तसेच पंढरपूर, तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविकांची वाहने अडवून कशी खंडणी वसूल केली जाते याबाबत सांगितले होते. माझी दोन्ही मुले कायद्याचे शिक्षण घेत असून एका मुलासाठी पैसे देऊन पोलिस संरक्षण द्या म्हटले तरी अद्याप दिलेले नाही विधानसभा सदस्यांना अशी वागणूक दिली जात असेत तर कसे काम करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे मत त्यांनी मांडले.

Rajendra Raut
'हीच ती वेळ' म्हणत देशातील बड्या नेत्याचा राजकारणातून संन्यास

पोलिस निरीक्षकांना पोलिस अधिक्षक पाठबळ देत आहेत जिल्ह्यातून एक ते दीड कोटी हप्ता सोलापूरला जात असून प्रॉपर्टीचे लिलाव पुकारतात त्याप्रमाणे पंढरपूर, तुळजापूर रस्त्याचे लिलाव कोणत्या पोलिसांनी किती लाखाला घ्यायचे ठरते. कायदा व सुव्यवस्थेची वाईट अवस्था जिल्ह्यात झाली असून इतकी वाईट अवस्था आम्ही कधी पाहिली नव्हती. आवाज उठवला तर चिरडण्याचा प्रयत्न होत असून सुरक्षितता राहिली नाही, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.

राऊत म्हणाले, अप्पर पोलिस अधिक्षकांनी अवैध व्यवसायिकांना बोलावून घेऊन चौकशी केली आणि पोलिस निरीक्षक तुमच्याकडून पैसे घेतात का? असे विचारण्यात आले. मात्र, असे कोणी सांगणार आहेत का? अशा बोगस चौकशी करुन आमदारांच्या अंगावर सोडण्याचे काम पोलिस प्रशासन करीत आहे.

Rajendra Raut
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची वात भाजपनं दिल्लीतही पेटवली!

अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन बसायला खुर्ची दिली जाते तर जि.प. सदस्य, नगरसेवक यांना किंमत दिली जात नाही. गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आमची चूक असेल तर आमच्यावरही कारवाई करा, असे सांगत अध्यक्ष महोदय, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घालावे असे आमदार राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com