पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला आमदार राजेंद्र राऊतांची भरस्टेजवर मारहाण

मारहाणीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र, त्या कार्यकर्त्याला राऊतांनी मारहण केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
Rajendra Raut beat activist
Rajendra Raut beat activist Sarkarnama

सोलापूर : बार्शीचे (Barshi) आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला एका सार्वजनिक कार्यक्रमात भरस्टेजवर सर्वांसमोर कानशिलात लगावली. राऊत यांनी केलेल्या या मारहाणीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र, त्या कार्यकर्त्याला राऊतांनी मारहण केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. (Barshi MLA Rajendra Raut beats activist on stage)

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आपल्याला सुरक्षा द्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती? या मारहाणीच्या व्हिडिओनंतर ‘पोलिस सुरक्षेत मारहाण करून लोकांवर दहशत बसविण्यासाठी सुरक्षेची मागणी केली काय?’ असे प्रश्न या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जात आहेत.

Rajendra Raut beat activist
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात येऊन शाहू महाराजांची भेट घेणार!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता आमदारांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लागवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. बार्शीत एका क्रिकेट सामन्याच्या कार्यक्रमावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडण्यासाठी एक कार्यकर्ता आला होता. तो आमदारांच्या चरणावर मस्तक ठेवून लिनही झाला. मात्र, तो जसा पाया पडून वर उठला, तशी आमदारांनी त्याच्या कानशिलात लगावली.

Rajendra Raut beat activist
पूर्वीच्या सरकारमध्ये एकट्या भाजपचा त्रास होता; आता दोघांकडून होतोय : शिवसेना नेत्याची कबुली

या कानशिलात लगवल्याचं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. मात्र, आमदारसाहेबांच्या पाया पडून कानाखाली प्रसाद मिळालेल्या घटनेचा व्हिडीओ जिल्हाभरात चांगलाच वायरल होत आहे. तसेच एखाद्याने पाया पडल्यानंतर कोणताही व्यक्ती पाया पडणाराची चूक माफ करतो. मात्र, बार्शीत नेमकं उलट घडलं आहे. पाया पडला आणि कार्यकर्ता कानाखाली प्रसाद घेऊन गेला आहे, अशी चर्चाही जिल्ह्यात रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in