Barshi : अनेक पराभवांनंतर अखेर दिलीप सोपलांच्या अंगावर गुलाल

तालुक्याच्या राजकारणात पुन्हा स्थान निर्माण करण्यासाठी दिलीप सोपल यांनी सोसायट्यांच्या निवडणुकीत व्यक्तिगत पातळीवर मोर्चे बांधणी केलीय. (Barshi News)
Ex. Mla Dilip Sopal, Barshi
Ex. Mla Dilip Sopal, BarshiSarkarnama

बार्शी : विधानसभा तसेच स्थानिक निवडणुकांत पराभवांचा सामना करावा लागलेल्या माजी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्या अंगावर अखेर विजयाचा गुलाल पडला आहे. सोपल यांचे मूळ गाव असलेल्या येळंब सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी १३ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. (Barshi) विजयानंतर कार्यकत्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली. तालुक्यातील जवळपास ६० सोसायट्यांवर सोपल गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत सातवेळा आमदार राहिलेले दिलीप सोपल यांचा अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी पराभव केला होता. (Maharashtra) निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत सोपल यांनी शिवबंधन (Shivsena) बांधले. मात्र राऊत यांना भाजपकडून मिळालेली रसद, तसेच राष्ट्रवादीच्या उमेदवारामुळे फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या वैराग नगरपंचायत निवडणुकीत देखील सोपल गटाचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांच्यासह समर्थकांमध्ये मरगळ आल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रवेश मिळवायचा असल्यास तालुक्यातील सोसायट्या जिंकणे सोपल तसेच राऊत यांच्यासाठी महत्वाचे आहे. सोपल हे बरेच वर्षे जिल्हा बँकेवर संचालक तर काहीकाळ अध्यक्ष राहिलेले आहेत.

आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे सध्या पंचायत समिती, नगरपालिका तसेच बाजार समितीची सत्ता आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात सोपल गटाची मोठी पीछेहाट झालेली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सोसायट्यांवर सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये काटे की टक्कर सुरु आहे.

Ex. Mla Dilip Sopal, Barshi
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची ठाकरे सरकारनं कत्तल केलीय ; फडणवीस संतप्त

तालुक्याच्या राजकारणात पुन्हा स्थान निर्माण करण्यासाठी दिलीप सोपल यांनी सोसायट्यांच्या निवडणुकीत व्यक्तिगत पातळीवर मोर्चे बांधणी केलीय. दुसरीकडे राजेंद्र राऊत यांनी देखील जवळपास १८ सोसायट्यांवर विजय मिळवला आहे.

आणखीन काही गावांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यानंतरच जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे सोपल यांच्या अंगावरील गुलाल कायम राहणार कि राऊत पुन्हा एकदा मात देणार हे आगामी काळामध्ये पहावं लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com