Pandharpur : हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांनी पाणी पळवल : मंत्री शेखावत

Ranjitsinh Naik Nimbalkar खासदार रणजितसिंह म्हणाले, आपण केलेल्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतल्यानंतर माढा करमाळ्यासह संपूर्ण दुष्काळी पट्ट्याला कृष्णेच्या पाण्याचा लाभ होईल, अशी आशा श्री. शेखावत यांच्या दौऱ्याने दिसत आहे.
Minister Gajendra singh Shekhawat
Minister Gajendra singh ShekhawatSarkarnama

Pandharpur News : निरा देवघर सिंचन प्रकल्प Neera Devghar Project पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीही प्रयत्न केले होते. केंद्रीय जलसंपदा मंत्री या नात्याने दोन वेळा आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, पूर्वीच्या सरकारने याबाबत वेळकाढूपणाची भूमिका घेतली. निरा-देवघरच्या पाण्याचा हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांनी पाणी पळवले, असा आरोप केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत Gajendra singh Shekhawat यांनी केला आहे.

सोमवार (दि. १३) रोजी पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेखावत बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, प्रशांत परिचारक, समाधान आवताडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थित होते. जेंद्रसिंह शेखावत म्हणाले, राज्यातील ९४ तालुक्यांपैकी ५६ तालूके कृष्णा खोऱ्यात व पश्चिम महाराष्ट्रात येतात. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील ५६ तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

राजस्थानसारख्या ज्या राज्यातून आम्ही येतो तिथेही पाणी टंचाईचा प्रश्न गहन आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेबद्दल आपण सकारात्मक आहे. कृष्णा पाणी तंटा लवादमधील नियमानुसार एका खोऱ्यातले पाणी दुसऱ्या खोऱ्यात आणता येत नाही. त्यामुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना रखडली. पण, कृष्णा पाणी तंटा लवादमधील पाणी वाटपाची फेररचना करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

Minister Gajendra singh Shekhawat
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

ही फेररचना करण्यासाठी ब्रिजेशकुमार आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरणार आहे, लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा यांच्यात सध्या कृष्णा नदीच्या पाण्यावरुन वाद सुरु आहेत. या वादात तेलंगणा राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पण, हा प्रश्न निकाली निघेल, असा प्रयत्न आम्ही करत आहोत. निरा देवघर सिंचन प्रकल्प हा राज्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितरित्या प्रयत्न करेल.

Minister Gajendra singh Shekhawat
Phaltan : पालखी मार्ग सुशोभीकरण; खासदार निंबाळकरांचे मंत्री गडकरींना साकडे

निरा देवघर सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीही प्रयत्न केले होते. केंद्रीय जलसंपदा मंत्री या नात्याने दोन वेळा आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, पूर्वीच्या सरकारने याबाबत वेळकाढूपणाची भूमिका घेतली. अन्यथा, हा प्रकल्प पूर्वीच पूर्ण झाला असता. पण, निरा-देवघरच्या पाण्याचा हायड्रॉलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांना पाणी पळवायचे होते, असे श्री. शेखावत यांनी स्पष्ट केले.

Minister Gajendra singh Shekhawat
Satara : राष्ट्रवादी 'युवक'ने केले कोश्यारींना बाय बाय...

खासदार रणजितसिंह म्हणाले, आपण केलेल्या विनंतीनुसार प्रत्यक्ष पाहणी करुन माहिती घेतल्यानंतर माढा करमाळ्यासह संपूर्ण दुष्काळी पट्ट्याला कृष्णेच्या पाण्याचा लाभ होईल, अशी आशा श्री. शेखावत यांच्या दौऱ्याने दिसत आहे. दरम्यान, आज (सोमवार, ता. १३) निरा देवघर सिंचन प्रकल्पाच्या वाघोशीपर्यंत झालेल्या कालव्याच्या कामाची पाहणी, तद्नंतर प्रस्तावित लाभक्षेत्राची पाहणी, उद्धट व तावशी येथील निरा भीमा स्थिरीकरणाच्या कामाची पाहणी याबाबत केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत यांनी माहिती घेतल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Minister Gajendra singh Shekhawat
Satara : मी शब्द पाळणारा आमदार; कदमांनी फुकटची काळजी करू नये : शिवेंद्रसिंहराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com