बानुगडे-पाटील म्हणतात, शिवसेनेचे उमेदवार अन्‌ आमदार ही शेखर गोरेच...

प्रशांत काळे Prashant Kale म्हणाले, जिल्ह्यात शेखर गोरेंच्या Shekhar Gore रूपाने पक्षाला ताकदीचा माणूस मिळाला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याची माहिती आपण वरिष्ठापर्यंत पोहोचवत त्यांना ताकद दिली जार्ङल.
बानुगडे-पाटील म्हणतात, शिवसेनेचे उमेदवार अन्‌ आमदार ही शेखर गोरेच...
Nitin Banugade Patil, Shekhar Goresarkarnama

बिजवडी : २०२४ ला शिवसेनेचे उमेदवार अन् आमदारही शेखर गोरेच असतील, त्यासाठी मोठी ताकद शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी करणार आहे. त्यामुळे निश्चितच ते मतदारसंघासह जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवतील, असे मत शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दहिवडी (ता.माण) येथे शिवसंपर्क अभियानातंर्गत पदाधिकारी व शिवसैनिकांच्या संवाद दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निरीक्षक प्रशांत काळे, ठाणेचे नगरसेवक तात्यासाहेब माने, विशाल पावसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे, महिला जिल्हा अध्यक्ष छाया शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, खटाव तालुका प्रमुख शहाजी राजे गोडसे, उप तालुका प्रमुख बाळासाहेब जाधव, उपतालुका प्रमुख महेश गोडसे, राजेंद्र जाधव, वैभव मोरे उपस्थित होते.

Nitin Banugade Patil, Shekhar Gore
बेळगावसह सीमाभागाबाबत आता शिवसेना देणार टक्कर; एकीकरण समितीबाबत राऊतांचं मोठं विधान

प्रा. नितीन बानुगडे - पाटील म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यात राष्ट्रवादी शिवसेनेला विश्वासात घेत नाही. जिल्हा बँकेतही शेखर गोरे या शिवसेनेच्या वाघाने राष्ट्रवादी विरोधात संचालक पदाची निवडणूक लढवून जिंकली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांत ही जिल्ह्यात आपल्याला शिवसेनेची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागावे.

Nitin Banugade Patil, Shekhar Gore
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

पक्षनिरिक्षक प्रशांत काळे म्हणाले, जिल्ह्यात शेखरभाऊ गोरेंच्या रूपाने पक्षाला ताकदीचा माणूस मिळाला आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या कार्याची माहिती आपण वरिष्ठापर्यंत पोहोचवत त्यांना अजून मोठी ताकद देण्यासाठी निश्चितच शिफारस करणार आहोत. मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे व प्रा.नितीन बानुगडे - पाटील यांच्यासह वरिष्ठ नेतेमंडळींनी शेखर भाऊंना ताकद देत २०२४ ला माणमधून शिवसेनेचाच आमदार बनवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in