आयुक्तांच्या भेटीनंतर जायचे की राहायचे ते ठरविणार : प्रशासक कोतमिरेंची भूमिका

Solapur : प्रशासक कोतमिरे यांनाच कायम ठेवावे या संदर्भात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त कवडे यांची भेट घेतली आहे.
Solapur
Solapursarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Bank) प्रशासक पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा, असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांना आपण दिले, असल्याची माहिती प्रशासक तथा राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे (Shailesh Kotmire) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

प्रशासक कोतमिरे यांनाच कायम ठेवावे या संदर्भात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त कवडे यांची भेट घेतली आहे. आयुक्त व कर्मचारी यांच्या भेटीनंतर माझी व आयुक्त कवडे यांची अद्याप भेट झाली नाही. त्यांची भेट झाल्यानंतरच मी राहणार की जाणार हे निश्‍चित होईल, अशी माहिती प्रशासक कोतमिरे यांनी आज दिली.

Solapur
शिवसेनेला हरवण्यासाठी मुन्नभाई, गद्दार एकत्र येत आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

प्रशासक म्हणून किमान मार्चपर्यंत तरी कोतमिरे यांनाच कायम ठेवावे या मागणीसाठी बॅंकेच्या 55 कर्मचाऱ्यांनी सहकार आयुक्त कवडे यांची पुण्यात भेट घेतली होती. कोतमिरे यांच्या सारखे सक्षम अधिकारी मी किती दिवस बाहेर ठेवू, मला चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे, या संदर्भात मी कोतमिरे यांच्याशी चर्चा करतो अशी भूमिका सहकार आयुक्त कवडे यांनी या भेटीनंतर कर्मचाऱ्यांसमोर मांडली होती.

प्रशासक कोतमिरे म्हणाले, माझ्या वैयक्तिक अडचणी असल्याने मी हे पत्र दिले आहे. हे पत्र देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. कर्मचारी सहकार आयुक्तांना भेटल्यानंतर माझी व सहकार आयुक्तांची अद्यापही भेट झालेली नाही. या आठवड्यात आमची भेट होईल, या भेटीनंतर मी पुढील निर्णय घेणार आहे. जिल्हा बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज प्रशासक कोतमिरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

प्रशासकपदी कोतमिरे यांना एक वर्ष ठेवावे. बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आणखी किमान एक वर्षे तरी नको, अशी भूमिका माढा तालुक्‍यातील सभासदांनी घेतली. प्रशासक म्हणून कोतमिरे यांना कायम ठेवण्याचा आयत्या वेळेचा ठराव शिवाजी पाटील-चांदजकर यांनी मांडला, हा ठराव आजच्या सभेत मंजूर झाला आहे.

Solapur
मी तर तीन महिन्यापुर्वीच आसमान दाखवलं; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...

बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बॅंकेवर प्रशासक नियुक्त केला. त्यावेळी बॅंकेची स्थिती अंत्यंत बिकट होती. त्यावेळी बॅंकेचा एसएलआर डिफॉल्ट झाल्याने डीसीसीला आरबीआयने सात कोटींचा दंड केला. आम्ही तत्काळ हा दंड भरला. बॅंकेच्या चार हजार कोटींच्या ठेवी सध्या झाल्या आहेत. इतर उत्पन्न 2018 मध्ये तीन कोटी होते, आता 25 कोटी झाले आहे.

बॅंक पुन्हा उभा राहू लागली आहे. हे सर्व यश माझ्या एकट्याचे नाही, बॅंकेशी जोडलेल्या प्रत्येक घटकाचे हे यश आहे. माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बॅंक वाचली पाहिजे एवढ्याच एका हेतूने आपण या बॅंकेच्या प्रशासकपदाची जबाबदारी स्विकारली असल्याचे कोतमिरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com