बाळासाहेबांच्या विचाराने चालताय मग औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर टीका केली.
Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

अहमदनगर - राज्यातील शिंदे गट व भाजपच्या सरकारने महाविकास आघाडीचे निर्णय स्थगित करण्याचा सपाटा लावला आहे. यातच तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा घेतलेला निर्णयही स्थगित करण्यात आला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर टीका केली. ( Balasaheb's thinking is going on, so why postpone the renaming of Aurangabad? )

अकोले येथे अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज शेतकरी समृद्धी मंडळाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी पवार आले होते, सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना पवार बोलत होते.

Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
सरकारने केलेली पेट्रोल-डिझेलची दरकपात अत्यंत तोकडी; सामान्यांना फायदा नाही : अजित पवार

अजित पवार म्हणाले, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं. माझं सरकार आल्यावर मी औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करेल. मग आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे आहोत असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या नामांतराला स्थगिती का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

ते पुढे म्हणाले की, लवकर मंत्रीमंडळ नेमण्यात येत नाही. पालकमंत्री नेमले गेले नाहीत उद्या मी मुख्यमंत्री यांची भेट घेणार जबाबदारी वाटून द्यायला हवी. राज्याला इतके दिवस मंत्रीमंडळापासून पूर्ण बहुमत असतांना वंचित ठेवण बरोबर नाही. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे याबाबत राज्य सरकारने तात्काळ अॅक्शन घेण्याची गरज आहे.

Ajit Pawar Latest Marathi News, Eknath Shinde Latest News
सरकार येते जाते कोणी ताम्रपट घेऊन आला नाही : अजित दादांनी पिचड समर्थकांना सुनावले

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना शिवसेनेने एनडीएचा उमेदवार सोडून पाठिंबा दिलेला आहे. मातोश्रीने आताचा निर्णय योग्य वाटला म्हणून घेतला. राजकीय लोकांच्या भेटी गाठी होतच असतात , मत मतांतर असत म्हणजे पण आम्ही एकमेकांशी दुश्मन नसतो आपल्या महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे. राज ठाकरेंचं मागील कालावधीत ऑपरेशन झालं म्हणून कदाचित देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले असावे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in